क्रीडा

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Cheteshwar Pujara creates record in Ranji trophy

बॉर्डर – गावस्कर ट्रॉफी सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही मालिका सुरू होण्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) रणजी ट्रॉफी स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. आंध्रप्रदेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ९ धावांनी त्याचे शतक हुकले. मात्र त्याने आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षी त्याला फॉर्ममध्ये नसल्यामुळे संघाबाहेर व्हावे लागले होते. मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्र संघासाठी खेळताना त्याने जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान शुक्रवारी (२० जानेवारी) त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

आंध्रप्रदेश विरुध्द झालेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजारा शतक झळकावण्याच्या वाटेवर होता. त्याने १४६ चेंडूंचा सामना करत ९१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने एकूण ११ चौकार मारले. त्याची ९१ धावांची ही खेळी वाया गेली. कारण सौराष्ट्र संघाला हा सामना १५० धावांनी गमवावा लागला आहे.

चेतेश्वर पुजाराच्या १२ हजार धावा पूर्ण..

पुजाराने आंध्रप्रदेश संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने १४५ व्या सामन्यात हा कारनामा केला आहे. यादरम्यान त्याची सरासरी ६० पेक्षा कमी राहिली आहे. त्याने एकूण २४० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १८४०० धावा केल्या आहेत. भारतीय संघांसाठी त्याने एकूण ९८ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४४.३९ च्या सरासरीने ७०१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १९ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली आहेत. असा कारनामा करणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा वसीम जाफरच्या नावे आहे. वसीम जाफरने १४,६०९ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराला महत्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. हे कसोटी सामने नागपूर, दिल्ली, धर्मशाळा आणि अहमदाबादच्या मैदानावर पार पडणार आहेत.

हे ही वाचा..

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button