भारतीय कसोटी संघातील महत्त्वपूर्ण फलंदाज चेतेश्वर पुजारा हा शुक्रवारपासून इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशिप मध्ये ससेक्स संघाकडून क्रिकेट खेळणार आहे. पुजाराने 2022 मध्ये ससेक्स संघाकडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने या संघाकडून एकूण 18 सामने खेळले आहेत. या हंगामात तो सात सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
चेतेश्वर पुजाराने ससेक्स संघाकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 64.24 च्या सरासरीने 1883 धावा केल्या आहेत, ज्यात आठ शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराने रणजी क्रिकेटमध्ये 2023-24 या हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने सौराष्ट्रकडून खेळताना 13 डावात 69.80 च्या सरासरीने 829 धावा केल्या आहेत. यापूर्वी तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डर्बीशायर, यॉर्कशायर आणि नॉटिंघमशायर या संघाकडून खेळत होता.
पुजाराने रणजी ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली आहे. यात त्यांनी दोन द्विशतक ठोकली आहेत. पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2023 WTC Final नंतर भारतीय संघात बाहेर आहे. अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर त्याला संघाबाहेर बसवण्यात आले. त्यानंतर त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी भेटली नाही. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून तो भारतीय संघात पुन्हा परतण्यासाठी धडपडत आहे. यासाठी रणजी क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पडलाय.
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमधून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. त्यावेळी भारतीय संघात चेतेश्वर पुजारा याला संधी मिळेल असे बोलले जात होते. मात्र निवड समितीने युवा खेळाडू सोबत पुढे जाण्याचे ठरवले. त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली आहे. या मालिकेमध्ये निवड समितीने रजत पाटीदार आणि सरफराज खान सारख्या युवा खेळाडूंना संधी मिळाली. या दोघांनीही संधीचे सोनं करत धडाकेबाज कामगिरी करून दाखवली. चेतेश्वर पुजाराला आयपीएल मध्ये एकाही संघाने खरेदी करण्यास इंटरेस्ट दाखवला नाही. संधी न मिळाल्याने पुजाराने पुन्हा एकदा काउंटीची वाट धरली आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.