- Advertisement -

या युद्धाच्या वेळी जपानी सैन्यांनी चीनमधील तब्बल 80 हजार महिलांवर बलात्कार केला होता, जपानच्या सैन्याने केले होते आजवरच्या इतिहासातील सर्वांत दुष्कर्मी काम..

0 0

या युद्धाच्या वेळी जपानी सैन्यांनी चीनमधील तब्बल 80 हजार महिलांवर बलात्कार केला होता..


जपान आणि चीन यांच्यादरम्यान सुरु झालेले युद्ध पुढे जाऊन दुसऱ्या महायुद्धात रुपांतरीत झाले होते. हे युद्ध म्हणजे मनुष्य जातीचा नरसंहारचं म्हणावे लागेल.कारण या युद्धामध्ये जपानी सैन्याने युद्धाचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते. अर्थातच त्यांना तसी देशाकडून सुट देण्यात आली होती.

या युद्धाचे किस्से आजही अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात मात्र त्यात ही एक गोष्ट नेहमी दुखदायक वाटते की, जपानी सैन्यांनी  युद्धादरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी  घटना तब्बल महिनाभर सारखी केली होती. अर्थातचं ती घटना म्हणजे ‘चीनी महिलांचे लैंगिक शोषण’

जपानने चीनवर केलेला हल्ला आणि जपानी सैन्याचा हा क्रूरपणा जगाच्या इतिहासात एक काळा अध्याय म्हणून नोंदवला गेला आहे, कारण या काळात जपानी सैन्याचा क्रूरपणा खूपच भयावह होता.अगदी अलीकडे जपानी सैनिक गिसाबुरो इकेडा याने हस्तलिखित कबुलीजबाब 19 जून 1938 मधील एक घटना प्रकट करते.

युद्ध

यात जपानी सैन्याच्या क्रूरतेची नवी कबुली समोर येत आहे. त्यानुसार, महायुद्धाच्या काळात जपानी सैनिकांनी एक हजार चिनी नागरिकांना जोंगमाऊ शहरातून बाहेर काढले आणि पिवळी नदीत बुडवले. जपानच्या सैनिकांचे हे कबुलीजबाब चीनच्या ‘अर्काइव्ह अथॉरिटी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर’ला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकामागून एक प्रसिद्ध केले जात आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने महिलांवर असा क्रूरपणा करणे ही मानवाच्या इतिहासातील सर्वात क्लेशकारक घटना आहे, कारण जपानी सैनिकांनी चीनमधील नानजिंग शहरावर हल्ला केला तेव्हा सुमारे 80 हजार चिनी महिलांवर बलात्कार झाला.त्याच सुमारे 3 लाख चिनी नागरिकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले.नानजिंग शहरावरील हल्ल्याच्या वेळी हा आकडा केवळ 6 आठवड्यांचा आहे.

युद्ध

संपूर्ण शहर जपानी सैन्याने उद्ध्वस्त केले. जपान इथेच थांबला नाही, त्याने उत्तर, पूर्व आणि दक्षिण चीनचा ताबा घेतला होता, पण पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भाग ताब्यात घेण्यात जपानला अपयश आले.

एकामागून एक विजय मिळवून 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला, त्यानंतर अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध घोषित केले. त्याच वेळी, सोव्हिएत संघाने जपानच्या ताब्यात असलेल्या मंचूरियावर हल्ला केला. यानंतर अमेरिकेने जपानविरुद्धच्या युद्धात चीनला मदत करण्यास सुरुवात केली.

जपान आणि चीनचे हे युद्ध आता दुसऱ्या महायुद्धाचा भाग बनले होते आणि अमेरिकेची मदत मिळाल्यानंतर जपान कमकुवत होऊ लागला. हिरोशिमा आणि नागासाकीवर आण्विक हल्ल्यांनंतर, जपानने पराभव स्वीकारला आणि 1945 मध्ये आत्मसमर्पण केले.

या युद्धात चिनी नागरिक आणि सैनिकांसह एकूण 35 दशलक्ष लोक मारले गेल्याचा चीनचा दावा आहे.त्याच वेळी, जपानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, 2 लाख जपानी सैनिक मारले गेले.


 

Leave A Reply

Your email address will not be published.