युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसून येत नाहीये. टी -२० क्रिकेटमध्ये त्याची आक्रमक फलंदाजी पाहण्याची मजा काही औरच होती. ज्यादिवशी ख्रिस गेल फॉर्ममध्ये असायचा, तो दिवस गोलंदाजासाठी वाईट दिवस ठरायचा. दरम्यान त्याला आपल्या क्रिकेट कारकीर्दीदरम्यान सर्वात बेस्ट असा गोलंदाज कोण? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने काय उत्तर दिले चला पाहूया.
तर झाले असे की, जिओ सिनेमावरील एका शोमध्ये रॉबिन उथप्पाने ख्रिस गेलला विचारले की, आतापर्यंत तू ज्या गोलंदाजांचा सामना केला आहे, त्यापैकी सर्वात बेस्ट गोलंदाज कोण आहे? यावर उत्तर देत ख्रिस गेल म्हणाला की, “प्रत्येक गोलंदाज बेस्ट आहे, मात्र मी ज्या बेस्ट गोलंदाजाचा सामना केला आहे असा गोलंदाज आजवर जन्माला आला नाही.” हे उत्तर त्याने हसत दिले. मात्र एक गोष्ट तर खरी आहे की, ख्रिस गेल कुठल्याही गोलंदाजाविरुध्द खेळताना मनसोक्त फलंदाजी करायचा.

रॉबिन उथप्पा आणि ख्रिस गेल दोघेही यावेळी आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येणार नाहीये. मात्र हे दोघेही समालोचन करताना दिसून येऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेतून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे तो या स्पर्धेत समालोचन करताना दिसून येऊ शकतो.
हे ही वाचा..
रणजी ट्रॉफी स्पर्धेत रोहितची आक्रमक खेळी! ६४ चौकार अन् ६ षटकारांच्या मदतीने ठोकल्या ५७५ धावा..