‘भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार’ परंतु ,वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने भारतीय संघावर केले मोठे वक्तव्य..
‘भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार’ परंतु,वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने भारतीय संघावर केले मोठे वक्तव्य..
वेस्ट इंडीजचा माजी स्टार क्रिकेटर ख्रिस गेल हा अतिशय स्फोटक खेळाडू म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. ख्रिस गेलने काही दिवसापूर्वी ऑस्ट्रोलीयामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल एक मोठ वक्तव्य केलं आहे.यात त्याने दोन अश्या संघांची नावे घेतली आहेत जे येणाऱ्या विश्वचषकात विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार आहेत.याचं दोन टसंघामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल असेही त्याने म्हटले आहे.
तुम्हाला सुद्धा त्या दोन संघांची नावे जाणून घ्यायची आहेत तर चला जाणून घेऊया नक्की ख्रिस गेल आपल्या वक्तव्यात काय म्हणाला होता ? आणि कोणते आहेत ते दोन संघ जे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत स्पर्धेचे मुख्य दावेदार आहेत.
View this post on Instagram
ऑस्ट्रोलीया मध्ये १६ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणर आहे. ज्यात जवळपास सर्वच प्रमुख देशाचे संघ सहभागी होणार आहेत. यात सर्वच संघात मोठी स्पर्धा पाहण्यास मिळेल यात वाद नाही. मात्रख्रिस गेलच्या मते काही असे संघ आहेत जे या स्पर्धेत विजयाचे प्रमुख दावेदार आहेत. आणि विश्वचषक त्याच संघापैकी एक कोणतरी जिंकेल.
गेलच्या या वक्तव्याने भारतीय संघाच्या चाहत्यांना थोडासा धक्का बसू शकतो कारण ,जेव्हा ख्रिस गेलला पत्रकाराने प्रश्न विचारला की, भारत विश्वचषक जिंकू शकतो का? तर गेलने दिलेले उत्तर असे होते की.
‘भारत विश्वचषक जिंकू शकणार नाही,परंतु तो त्याचा दावेदार मात्र आहे’
तर भारत नसून विश्वचषक जिंकणारा संघ हा ‘वेस्ट इंडीज’ असेल असा आत्मविश्वास त्याला आहे. आपल्या अभियानाची सुरवात वेस्टइंडीजचा संघ १७ ऑक्टोबरपासून स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यातून करणार आहे. तसं आता पहिले तर विश्वचषक रणधुमाळ सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
ज्यामुळे जवळपास सर्वच संघ हळू-हळू ऑस्ट्रोलीयातील मेलबर्नमध्ये पोहचले आहेत.वेस्ट इंडीज’ग्रुप अ’ चा हिस्सा आहे. ज्याचा पहिला सामना १७ ऑक्टोबरला खेळणार आहे. पहिल्या साखळी सामन्यात गुणतालिकेतीलवरचे दोन संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करतील.
त्यामुळे ख्रिस गेलच्या मते ,विश्वचषकाच्या विजयाचे प्रमुख दोन दावेदार हे वेस्ट इंडीज आणि भारत असतील.मात्र विश्वचषक हा वेस्ट इंडीजचा संघच जिंकेल.

याआधी ही वेस्ट इंडीजचा स्टार गोलंदाज ड्वेन ब्रावोने सुद्धा आपले मत यावर व्यक्त केले होते.मात्र त्यांच्या मते वेस्ट इंडीज नाही तर भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रमुख दावेदार असेल. आकरण वेस्ट इंडीज संघात सध्याआंद्रे रसल,पोलार्ड आणि ब्रावो सारख्या दिग्गज फलंदाजांची अनुपस्थिती संघाला कमकुवत करते, म्हणूनच संघ विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत असेल मात्र तो जिंकू शकेल असे ब्रावोला वाटत नाही.
साहजिकच आहे, हे दोन्ही खेळाडू अतिशय महान खेळाडू आहेत आणि त्यांनी क्रिकेटमध्ये आपली अनेक वर्ष घालवली आहेत. त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी आपापले वक्तव्य केले आहेत. आता येणाऱ्या दिवसांत नक्की कोणाचे वक्तव्य खरेव ठरेल ? की दोघांचेही वक्तव्य खर न ठरत तिसराच कोणता संघ विश्वचषक ट्रॉफी घेऊन जातो हे पाहणे रंजक ठरणार आहे..
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:
व्हिडीओ प्लेलीस्ट:
https://youtu.be/B1LQdUgULdU