“भावा, आता तरी माझे पैसे परत कर” तब्बल 16 कोटी रुपये मिळालेल्या निकोलस पूरनला ख्रिस गेलने मागितली मागची उधारी, सोशल मिडीयावर पडला हस्याचा पाउस, पहा व्हिडीओ.
“निक्कू, आता तरी माझे पैसे परत करशील का?” तब्बल 16 कोटी रुपये मिळालेल्या निकोलस पूरनकडे ख्रिस गेलने मागितली मागची उधारी, सोशल मिडीयावर उमडला हास्याचा पाउस, पहा व्हिडीओ.
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे मिनी लिलाव पार पडला. या लिलावात अष्टपैलू खेळाडूंची चांदी झाली. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याला पंजाब किंग्सने 18.50 कोटींच्या किंमतीत संघात घेतले. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्याव्यतिरिक्त कॅमरून ग्रीन याला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयात सामील केले. तसेच, बेन स्टोक्स याला 16.25 कोटी रुपयात चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्याकडे घेतले.
या तिघांव्यतिरिक्त आणखी एक खेळाडू होता, ज्याला या लिलावात चांगली बोली लागली. तो खेळाडू इतर कुणी नसून अष्टपैलू निकोलस पूरन (Nicholas Pooran) आहे. पूरनला लखनऊ सुपर जायंट्स संघाने 16 कोटी खर्चत ताफ्यात घेतले. पूरनची मागील काही काळातील कामगिरी तितकी चांगली नव्हती.

मागील आयपीएल हंगामापासून ते ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात त्याच्या बॅटमधून खास धावा निघाल्या नाहीत. तरीही लखनऊने त्याला मोठी बोली लावत ताफ्यात सामील केले. आता मित्र आणि संघसहकारी ख्रिस गेल (Chris Gayle) याने मजेत त्याची उधारी मागितली आहे.
गेलने मागितली पुरन कडे उधारी!
पूरन याची आयपीएल 2023च्या लिलावातील (IPL 2023 Auction) मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी लखनऊ आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खूपच मोठी चढाओढ पाहायला मिळाली. यामध्ये केएल राहुल (KL Rahul) याच्या लखनऊ संघाला विजय मिळाला. पूरनला इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर एका खास शोमध्ये विशेषज्ञाची भूमिका बजावत असलेला त्याचा संघसहकारी ख्रिस गेल याने मजेत म्हटले की, “निक्की, मी तुला जे पैसे उधार दिले होते, ते आता मला परत मिळू शकतात का?”
यावेळी गेलने पूरनला एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्याच्यावर मजेशीर अंदाजात निशाणा साधताना दिसला. निकोलस पूरन आयपीएल 2022मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. मात्र, त्याच्या खराब कामगिरीमुळे संघाने त्याला मुक्त केले. त्यानंतर पूरन टी20 विश्वचषकादरम्यान वेस्ट इंडिजसाठीही काही खास करू शकला नाही.
मात्र, त्यानंतर अबू धाबी टी10 लीगच्या नुकत्याच झालेल्या हंगामातील 10 सामन्यात पूरनने 234हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 345 धावा चोपल्या. या स्पर्धेत पूरन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कदाचित त्यामुळेच पूरनला लखनऊ संघाने इतक्या मोठ्या रकमेत ताफ्यात सामील केले असावे.