दोन सामने झाले तरी महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करण्याची संधी का भेटत नाही? प्रशिक्षकाने दिले उत्तर, थाला कधी उतरणार मैदानात?

दोन सामने झाले तरी महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करण्याची संधी का भेटत नाही? प्रशिक्षकाने दिले उत्तर, थाला कधी उतरणार मैदानात?

करोडो क्रिकेटप्रेमींच्या गळ्यात ताईत असलेला महेंद्रसिंग धोनी 42 वर्षाचा झाला आहे. वयाची चाळीशी पार केली तरी तो आयपीएलमध्ये अजून खेळताना दिसतोय. आयपीएलच्या तयारीसाठी तो नेट्स मध्ये सराव करत असताना मोठ-मोठे फटके मारतानाचे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी प्रत्येक क्रीडाप्रेमी उत्सुक आहे. आयपीएल मध्ये चेन्नईचे दोन सामने झाले असले तरी त्याला अजूनही फलंदाजी करण्याची संधी मात्र भेटली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे.

MS Dhoni Ipl Career: धोनी आयपीएलमध्ये चमकत आहे, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

पहिल्या दोन सामन्यात महेंद्रसिंग धोनीला  फलंदाजी करण्यास संधी का मिळाली नाही? याचा खुलासा संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मायकल हसी यांनी केले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी म्हटले की,

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे संघातील फलंदाजीचा क्रम हा मोठा झाला आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरतोय. आयपीएल 2023 पासून इम्पॅक्ट प्लेयर ला सुरुवात झाली आहे. या नियमाप्रमाणे प्रत्येक संघाला नाणेफेकीच्या वेळी पाच पर्यायी खेळाडूंची नावे देणे गरजेचे असते. ज्यापैकी एकाला फलंदाजी आणि गोलंदाजी करता येते.

चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात निर्धारित 20 षटकात सहा बाद 206 धावा केल्या होत्या. संघाने सात फलंदाज घेतल्याने धोनीचा फलंदाजीसाठी नंबर येत नाही. त्याची बॅटिंग पाहण्यासाठी चाहते अतुर झाले आहेत. हसीने या गोष्टीचा देखील खुलासा केला की,

ही रणनीती प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची आहे. त्यांना असे वाटते की पहिल्या चेंडूपासून आक्रमक मोठ-मोठे शॉर्ट खेळावे इम्पॅक्ट प्लेयर मुळे आता फलंदाजी मोठी झाली आहे. दोन्ही सारखे खेळाडूंना देखील आता वाट पाहावी लागत आहे. संघासाठी चांगली बाब ही आहे की, महेंद्रसिंग धोनी हा नेट्स मध्ये मोठमोठे फटके मारतोय.

आयपीएल 2024 ला सुरुवात होण्यापूर्वी धोनीने  कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी आता ऋतुराज गायकवाड हा सांभाळत आहे. महेंद्रसिंग धोनी हा केवळ खेळाडू म्हणून संघात खेळतोय. आयपीएलमध्ये  तो 2008 पासून चेन्नई सुपर किंग संघाचे नेतृत्व सांभाळत होता.

दोन सामने झाले तरी महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करण्याची संधी का भेटत नाही? प्रशिक्षकाने दिले उत्तर, थाला कधी उतरणार मैदानात?

भारतीय क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी-20 विश्वचषक 2007, वन डे विश्वचषक 2011 व आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 या तीन स्पर्धेत विजय मिळवला होता. यात महेंद्रसिंग धोनीचा सिंहाचा वाटा होता.  आयपीएल मध्ये त्याने 212 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 128 सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला तर 82 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर दोन सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

आयपीएल मध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा तो एकमेव खेळाडू आहे. तसेच त्याच्या यशाची टक्केवारी देखील अधिक आहे. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ दहा वेळा अंतिम सामना खेळला आहे. त्यापैकी पाच वेळा त्यांना किताब जिंकण्यात यश आले. 2013 मध्ये बीसीसीआयने या फ्रेंचाइजी वर दोन वर्ष खेळण्यास प्रतिबंध घातला होता.

महेंद्रसिंग धोनी 2008 पासून आयपीएल मध्ये खेळतोय त्याने आतापर्यंत 250 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्याने या लीगमध्ये 5082 धावा केल्या आहेत. आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे. विकेट कीपिंग मध्ये देखील त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. धोनीने 142 झेल पकडले असून 42 फलंदाजांना यष्टिचित केले आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *