2003 ची विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या चॅम्पियन खेळाडूने 25 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीला ठोकला रामराम!

2003 ची विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या चॅम्पियन खेळाडूने 25 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीला ठोकला रामराम,केली निवृत्तीची घोषणा...!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Collins Obuya announced Retirement: केनियाचा माजी कर्णधार कोलिंस ओबुया (Collins Obuya) याने वयाच्या 42व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती आहे. आफ्रिका येथे सुरू असलेल्या स्पर्धेदरम्यान युगांडा विरुद्ध केनियाचा पराभव झाल्यानंतर त्याने 25 वर्षाच्या दीर्घ कारकीर्दीला राम राम ठोकला. आफ्रिकन गेम्स ब्रांज मेडलच्या सामन्यात युगांडाने केनियाचा 106 धावांनी पराभव केला. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर या खेळाडूला केनिया आणि युगांडाच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला.

2003 ची विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या चॅम्पियन खेळाडूने 25 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीला ठोकला रामराम,केली निवृत्तीची घोषणा...!

केनियाचा माजी कर्णधार कोलिंस ओबुयाने क्रिकेटला ठोकला रामराम..

बालपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या या खेळाडूने 1998 मध्ये पहिल्यांदा 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत केनिया संघाची जर्सी घातली होती. तेथील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय संघात एन्ट्री केली. 2003 मध्ये केनियाचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. संघाच्या या यशात कोलिंस ओबुयाचे बहुमूल्य असे योगदान होते. भारताचे माजी खेळाडू संदीप पाटील हे या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यावेळी काम पाहत होते.

2003 विश्वचषक स्पर्धेत केनिया आणि श्रीलंका यांच्यात नरोबी येथे सामना झाला होता. या सामन्यात कोलिंस ओबुया ने धारदार गोलंदाजी करून श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजाची भंबेरी उडवून टाकली होती. 24 धावा देत पाच बळी घेतले होते. यामध्ये दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने, कुमार संगकारा, अरविंद डिसल्वा,सनथ जयसूर्या व उपुल तरंगा या दिग्गजाने बाद केले होते. त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर त्याला इंग्लंड मधील काऊंटी क्लब वोर्कशॉयेर संघाने त्याच्यासोबत एक वर्षाचा करार केला. 2003च्या विश्वचषक स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये केनियाचा भारताने 91 धावांनी पराभव केला होता.

2011 विश्वचषक स्पर्धा भारतात झाली होती. त्यावेळी केनियाने त्यांचा शेवटचा विश्वचषक खेळला होता. या स्पर्धेतही त्याने धमाकेदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलिया सारख्या चॅम्पियन संघाविरुद्ध नाबाद 98 धावा काढल्या होत्या. हा त्याचा शेवटचा विश्वचषक ठरला. या सामन्यामध्ये मिचेला जॉनसन, शॉन टेट, ब्रेट ली सारख्या दिग्गज गोलंदाजी आक्रमणा पुढे त्याने आपल्या बॅटिंगचे कौशल्य दाखविले.

केनिया कडून कोलिंस ओबुयाने 104 वनडे आणि 76 टी ट्वेंटी सामन्यात प्रतिनिधित्व केले होते. वनडे सामन्यात 25 च्या सरासरीने 2044 धावा केल्या होत्या 98 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होते. तसेच त्याच्या नावे 35 विकेट घेतल्याची नोंद आहे. तर 76 t20 सामन्यांमध्ये तिच्या सरासरीने 1794 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत 25 बळी घेतले होते. 

2003 ची विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या चॅम्पियन खेळाडूने 25 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीला ठोकला रामराम,केली निवृत्तीची घोषणा...!

क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचा निर्णय माझ्यासाठी मोठा निर्णय होता. माझ्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे की मी केनियाच्या संघाकडून क्रिकेट खेळलो. माझ्या चांगल्या आणि वाईट क्षणा सोबत जे सोबत राहिले त्यांना मी धन्यवाद देतो. 25 वर्ष क्रिकेट खेळल्याने मला खूप आनंद होतोय आणि मी खूप सुखी आहे. मला माझ्या कारकिर्दीवर गर्व आहे. आता वेळ प्रशिक्षण देण्याची आली आहे. त्यावर मी फोकस करणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *