हिंदू संस्कृती जगात सर्वात श्रेष्ठ मानली जाते. तसेच हिंदू संस्कृती सर्व जगभरात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. अनेक परदेशी लोक आपल्या संस्कृती चा अंगिकार करत आहे. तसेच या मागे अनेक कारणे सुद्धा आहेत. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात नवरा आणि बायको ने एका ताटात का जेवण करू नये काय आहे या मागील रहस्य याची सविस्तर माहिती देणार आहोत.

हिंदू संस्कृती मध्ये अनेक वेगवेगळे नियम आणि अटी आहेत हे तुम्हाला पण माहीतच आहे. वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. पूर्वी पासून चालत आलेल्या रूढी आणि परंपरा आपण पुढे चालवत आहे.
महाभारतात भीष्म पितामह यांनी अर्जुनाला सांगितले होते की ज्या थाळीला कोणाचा पाय लागला तर त्या थाळीतील जेवण जेऊ नये त्या थाळीचा त्याग करावा. तसेच जर का जेवणात केस आला तरी ते जेवण खाणे टाळावे कारण जेवणात केस आल्यामुळे आपल्या जीवनात दारिद्र्य वाढते.
भीष्म पितामह यांनी सांगितले की एका ताटात दोन्ही भावांनी जेवण करणे अधिक चांगले असते शिवाय दोन्ही भावांनी एका ताटात जेवण केल्यामुळे ते अमृतापेक्षा जास्त पवित्र होते. त्यामुळे अर्जुन आपल्या 5 भावांसोबत जेवण करायचे.
भीष्म पितामह यांनी सांगितल्याप्रमाणे नवरा आणि बायको ने एका ताटात जेवण करणे कधीच चांगले नसते. बहुतांशी नवरा आणि बायको ने वेगवेगळ्या ताटात जेवण करावे. जर एका ताटात जेवण केले तर दोघांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता असते त्यामूळे जेवण वेगवेगळ्या ताटात करावे त्यामुळे घरात सुख शांती राहते. आणि शांती राहिल्यामुळे घरात लक्ष्मी चा वास येतो. त्यामुळे आर्थिक परिस्थतीही सुधारण्यास मदत होते.