कोरोना पेक्षाही भयंकर असलेल्या या विषाणूंनी कधी जगभरात मृत्यूचे थैमान घातले होते..

कोरोना पेक्षाही भयंकर असलेल्या या विषाणूंनी कधी जगभरात मृत्यूचे थैमान घातले होते..

मानवी जीवन आधुनिक स्वरुपात विकसीत होण्याच्या पूर्वीपासूनच आपण अनेक विषाणू (व्हायरस) सोबत लढत आलो आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाने आज लस आणि अँटीवायरल औषधांचा शोध लावला आहे. यामुळे या विषाणूंचे संक्रमण जास्त  प्रमाणात पसरण्यापासून प्रतिबंधित करून आजारी लोकांना बरे होण्यासाठी मदत केली आहे. परंतु आम्ही व्हायरस विरूद्ध लढा जिंकण्यापासून बरेच दूर आहोत.

अलिकडच्या दशकात, अनेक विषाणूंनी प्राण्यांपासून मानवांकडे उडी मारली आणि हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत ओढवून घेतले. २०१४ ते २०१६ मध्ये पश्चिम आफ्रिकेत पसरलेल्या इबोलाचा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तब्बल संसर्ग झालेल्या ९० % लोकांचा बळी गेला आणि तो विषाणू इबोला कुटुंबातील सर्वात प्राणघातक सदस्य बनला.

आजही जगामध्ये अनेक विषाणू आहेत जे प्राणघातक आहेत, किंबहुना काही विषाणू तर महाविनाशकारी आहेत. त्याचेच प्रमाण सध्या जगभरात धुमाकूळ माजवणारा कोविड १९ हा विषाणू देत आहे. या विषाणूमुळे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका आहे कारण त्यांच्याशी सामना करण्यासाठी अद्याप आपल्याकडे कोणतेही परिणामकारक साधन नाही.

सध्या जगभरातील अनेक देश यावर लस शोधात आहेत. काही देशांनी तर या लसीचे मानवावर सफल परीक्षनही केले आहे. आज आपण जाणून घेवूया जगातील अत्यंत धोकादायक अशा विषाणूंबद्दल ज्यांचा संसर्ग जर एखाद्या व्यक्तीस झाला तर त्याचा मृत्यू झालाच समजा.

विषाणू

या खालील विषाणूंनी कधी एकेकाळी जगभरात मृत्यूचे थैमान घातले होते….

१ ) मार्बर्ग विषाणू (Marburg virus):  १९६७ मध्ये युगांडामधून आयात झालेल्या संक्रमित माकडांच्या संपर्कात आलेल्या जर्मनीमधील प्रयोगशाळेतील कामगारांमध्ये विषाणूजन्य लक्षणे दिसू लागली. तेव्हा शास्त्रज्ञांना (Marburg virus)मारबर्ग विषाणूची सर्वप्रथम माहिती मिळाली. हा विषाणू इबोला साराखाच आहे या दोन्ही विषाणूंच्या संसर्गाने उच्च ताप आणि रक्तस्त्राव होतो.

संक्रमिक लोकांच्या शरीरामध्ये ताप येवून अंतर्गत राक्त्त्राव होतो झटका येतो आणी हळूहळू अवयव निकामी होवून मृत्यू होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नुसार या विषाणूमुळे पसरलेल्या पहिल्या साथीमध्ये मृत्यूचे प्रमाण २५ % होते. परंतु याच विषाणूची साथ जेंव्हा १९९८-२००० मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये आणी २००५ मध्ये अंगोला येथे आली,यावेळी मात्र मार्बर्ग विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ८० % होते.

२ ) इबोला विषाणू (Ebola virus): इबोला विषाणूची पहिली ओळख 1976 मध्ये झाली होती. त्या वर्षाच्या अखेरीस, विषाणूच्या संबंधित दोन प्रजातींची ओळख इबोला जायर आणि इबोला सुदान म्हणून झाली. इतर तीन प्रजाती देखील आढळल्या होत्या. १९७० दशकाच्या च्या उत्तरार्धात लसांचा विकास सुरू झाला. गिनी पिग्स मधील निष्क्रिय इबोला विषाणूच्या चाचणीचा निकाल लान्सेटमध्ये १९८० मध्ये प्रकाशित झाला. २०१४ पर्यंत ईव्हीडीचा प्रादुर्भाव दुर्मिळ आहे आणि त्यावर नियंत्रित होत असल्याने व्यावसायिक लसी उत्पादकांनी क्लिनिकल ट्रायल्सद्वारे लसी तयार करण्यास कमी तयारी दर्शविली आहे.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार पश्चिम अफ्रिकेत झालेल्या प्रकोपची सुरूवात २०१४ च्या सुरूवातीस झाली. आजपर्यंतचा हा या विषाणूचा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा उद्रेक आहे.आज पर्यंत ११००० पेक्षा जास्त संभाव्य आणि संशयास्पद मृत्यूच्या घटना नोंदल्या गेल्या. एकूण ईव्हीडी प्रकरणांची संख्या २८००० पेक्षा जास्त होती.

कोरोना

३ ) रेबीज (Rabies): १९२० मध्ये तयार झालेल्या पाळीव प्राण्यांच्या लसीमुळे विकसित जगात रेबीज हा आजार अत्यंत दुर्मिळ होण्यास मदत झाली आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अजूनही रेबीज हि गंभीर समस्या आहे. जेंव्हा रेबीज विषाणू एखाद्या
व्यक्तीच्या मज्जासंस्थेपर्यंत पोहोचतो तेव्हा मेंदूत सूज येते.त्यामुळे संक्रमित व्यक्ती कोमात जाते किंबहुना मरते. रेबीज झालेल्या व्यक्तींना पाण्याची भीती वाटते. या व्यतिरिक्त काही लोकांना पक्षाघातही होऊ शकतो.

जर या रोगावर औषधोपचार केले नाही तर संकामित व्यक्तीची मरण्याची १०० % शक्यता असते. जगभरात दरवर्षी जवळजवळ ५९००० लोक रेबीजमुळे मरण पावतात. त्यापैकी ९० टक्के लोक रेबीज-संक्रमित कुत्र्याच्या चाव्याने मरतात. भारतात दरवर्षी रेबीजमुळे १८००० ते२०००० लोक मरतात. यातील बहुतेक मृत्यू उपचार आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे होतात.

४ ) एचआयव्ही (Human immunodeficiency virus): संसर्गजन्य रोग चिकित्सक आणी अमेरिकेच्या संसर्गजन्य रोग सोसायटीचे प्रवक्ता असलेले डॉ.अमेश अडलजा म्हणतात, आजच्या आधुनिक जगात सर्वात प्राणघातक विषाणू एचआयव्ही हाच आहे. १९८० या दशकाच्या सुरुवातीला एच.आय.व्ही.मुळे ३२ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या मानव जीवनावर सर्वात मोठा त्रासदायक संसर्गजन्य रोग म्हणजे एचआयव्ही विषाणू आहे.असेही अडलाजा म्हणतात.

कोरोना पेक्षाही भयंकर असलेल्या या विषाणूंनी कधी जगभरात मृत्यूचे थैमान घातले होते..

शक्तिशाली अँटीव्हायरल औषधांमुळे एचआयव्हीने बरेच वर्षे लोक जगणे शक्य केले आहे. परंतु हा आजार बर्‍याच कमी व मध्यम उत्पन्न असणाया देशांमध्ये जिथे ९५ % एचआयव्ही संसर्ग होतो जनजीवन उद्ध्वस्त करत आहे. आफ्रिकन प्रदेशातील प्रत्येक २५ प्रौढांपैकी जवळजवळ १ एचआयव्ही-पॉझिटिव्ह आहे. जगभरात एचआयव्हीने ग्रस्त दोन-तृतियांशाहून अधिक लोक आहेत.

५ ) हंता विषाणू (Hantavirus):  १९९३ मध्ये हंतावायरस पल्मोनरी सिंड्रोमने (एचपीएस) सर्वप्रथम अमेरिकेत आढळून आला होता. या विशानुबद्दल माहिती जगासमोर तेंव्हा आली जेंव्हा अमेरिकेत फोर कॉर्नर भागात राहणारा एक नवाजो युवक आणि त्याची प्रियसी श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. काही महिन्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी संक्रमित लोकांपैकी एकाच्या घरातून (deer)प्रजातीच्या उंदरापासून हंताव्हायरस अलग केला.

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतील ६०० हून अधिक लोकांना आता एचपीएस(Hantavirus) झाला आहे. आणि ३६ % लोक या आजाराने मरण पावले आहेत. या विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होत नाही. हा रोग संकामित उंदराच्या विष्ठेच्या संपर्कात आल्याने पसरतो. २०१० च्या क्लीनिकल मायक्रोबायोलॉजी रिव्यूज या पपेरानुसार कोरियन युद्धाच्या वेळी ३००० पेक्षा जास्त सैनिक या विषाणूने संक्रमित झाले हिते आणि यापैकी १२ % सैनिक मृत्युमुखी पडले होते.

याव्यतिरिक्त जगामध्ये इंफ्लुयांझा , स्मॉलपोक्स , डेंगू , रोटाव्हायरस , सार्स , मेर्स, यांसारखे अतिशय प्राणघातक विषाणूंनी कधीकाळी धुमाकूळ घातला होता. यावर आता अनेक लसीची निर्मिती झाली आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *