Cricket Records: भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यात केलेले ‘हे’ 4 विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाहीये..

Cricket Records: भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यात केलेले 'हे' 4 विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाहीये..

Cricket Records: खरे तर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. परंतु, आजही असे काही विक्रम आहेत जे अद्याप मोडलेले नाहीत आणि भविष्यातही कोणत्याही खेळाडूला तोडणे फार कठीण आहे. असे काही विक्रम भारतीय खेळाडूंनी रणजी ट्रॉफी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये केले आहेत, जे अद्याप कोणत्याही खेळाडूने मोडलेले नाहीत. आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला अशा विक्रमांची माहिती देणार आहोत जे अद्याप मोडलेले नाहीत.

most wicket taker bowler in t 20 Cricket Records
Cricket Records

Cricket Records: देशांतर्गत क्रिकेटमध्ये कधीही न मोडले गेलेले 5मोठे विक्रम.

 १.राजिंदर गोयलच्या रणजी विकेट्स

क्रिकेट राजिंदर गोयल भारताकडून खेळलेले सर्वांत चांगले गोलंदाज होते. भारतीय क्रिकेटमधील ज्या खेळाडूंना चांगली कामगिरी करूनही राष्ट्रीय संघात संधी मिळू शकली नाही. त्यांच्या काळातील महान फिरकीपटूंमध्ये त्याची गणना होते. पण, त्यांची सर्वात चमकदार कामगिरी रणजी ट्रॉफीमध्ये झाली. रणजी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६३७ विकेट्स आहेत. एवढी वर्ष उलटली मात्र घरेलू क्रिकेटमधील हा विक्रम आजही तसाच अबाधित आहे.

Cricket Records: भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यात केलेले 'हे' 4 विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाहीये..

२.. एका सत्रात 1415 धावा

व्ही व्ही एस.  लक्ष्मण, ज्याला टीम इंडियाचा दुसरा राहुल द्रविड म्हटले जाते, तो एक अत्यंत प्रतिभावान कसोटी क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. 1999 मध्ये काही वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर तो पुन्हा एकदा रणजी संघात सामील झाला होता आणि 1999-2000 रणजी क्रिकेटमध्ये लक्ष्मणने 108 च्या सरासरीने 1415 धावा केल्या. रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात कोणत्याही खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावा आहे.

या काळात लक्ष्मणने 9 सामन्यात सलग 8 शतके ठोकली. या स्फोटक कामगिरीनंतर त्याचा पुन्हा एकदा संघात समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे हा विक्रम मोडणे कोणत्याही खेळाडूला अशक्य वाटत आहे. जरी काही खेळाडू निश्चितपणे या विक्रमाच्या जवळ आले. मागच्या 24 वर्षापासून हा विक्रम आजही तसाच आहे. भारताकडून खेळणाऱ्या एकाही खेळाडूला या विक्रमाच्या अद्याप जवळपास देखील पोहचता आलेले नाहीये.

3. सर्वात कमी धावांवर संपूर्ण संघ बाद.

देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, कसोटी सामना हा कसोटी सामना असतो. देशांतर्गत स्तरावर कसोटीच्या धर्तीवर रणजी सामने खेळवले जातात. आज आम्ही तुम्हाला या रणजी इतिहासातील एका रंजक विक्रमाबद्दल सांगू इच्छितो. हे प्रकरण 2010 मध्ये जयपूरमध्ये झालेल्या रणजी सामन्याचे आहे. ज्यामध्ये हैदराबाद संघाने एक लाजिरवाणा विक्रम केला.

Cricket Records: भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यात केलेले 'हे' 4 विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाहीये..

हैदराबादचा हा संघ केवळ 21 धावांत ऑलआऊट झाला. या सामन्यात नवोदित क्रिकेटपटू दीपक चहरने 8 विकेट घेत हैदराबाद संघाचा पूर्ण कणाच मोडला होता.  या रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात कमी धावा करून बाद होण्याचा हैदराबादचा विक्रम कोणत्याही संघाला मोडायला आवडणार नाही.

4. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी

भारताला स्वातंत्र्य मिळून केवळ एक वर्ष पूर्ण होत असताना ही घटना घडली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा डोंगर उभा राहिला. होय, आम्ही बोलतोय महाराष्ट्राचा फलंदाज भाऊसाहेब निंबाळकर, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 443 धावांची नाबाद इनिंग खेळली.

Cricket Records: भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यात केलेले 'हे' 4 विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाहीये..

अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. ही धावसंख्या आजपर्यंत एकाही फलंदाजाने मोडलेली नाही. साधारण 1948 सालची गोष्ट आहे. पूना क्रिकेट ग्राउंड क्लब येथे 16-18 डिसेंबर दरम्यान काठियावाड आणि महाराष्ट्र यांच्यात झालेल्या सामन्यात हा डाव खेळला गेला. 73 वर्षांनंतरही हा विक्रम कायम आहे. या युगात जिथे सर्व गोलंदाज आपापल्या चेंडूने कहर करण्यात व्यस्त आहेत, हा विक्रम नेहमीच अस्पर्शित राहील. (4 big Cricket Records by indian players in Domestic Cricket League)


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *