विराटचा धमाका: ‘या’ 5 मैदानावर कोहलीने काढल्यात 500 पेक्षा अधिक धावा

विराट कोहली : क्रिकेटमध्ये फलंदाजांचे एक आवडते क्रिकेटचे मैदान असते. फलंदाज त्या मैदानावर मोठ्या स्फूर्तीने खेळ दाखवतात. ते मैदानही तितकेच त्यांना साथ देते. महाराष्ट्रातले असे एक मैदान आहे जे की विराटला बॅटिंग करताना नेहमीच साथ देते. या मैदानावरचा विराटचा रेकॉर्ड हे कमालीचा आहे. या मैदानावर खेळताना विराटने प्रत्येक मॅच मध्ये धमाल केली आहे. ते मैदान म्हणजे पुण्यातले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मैदान.

 या 5 मैदानावर विराट कोहलीने काढल्यात 500 हून अधिक धावा.

जबरदस्त पेशंन्स आणि गुणवत्तेने भरलेल्या विराटने पुण्याच्या मैदानावर 500 पेक्षा अधिक धावां केल्या आहेत. जगभरात पाच असे मैदान आहेत की ज्यात त्याने 500 पेक्षा अधिक धावा केले आहेत.

विराटचा धमाका: 'या' 5 मैदानावर कोहलीने काढल्यात 500 पेक्षा अधिक धावा

बांगलादेश मधील ढाका इथले मिरपूरचे मैदान विराट साठी प्रचंड लकी ठरले आहेत. या मैदानावर त्याने सर्वाधिक 800 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेमधील कोलंबोचे प्रेमदासा स्टेडियम विराटला नेहमीच साथ देते. याच मैदानावर त्याने तब्बल 644 धावा केल्या आहेत.

विराटने भारतातील विशाखापट्टणमच्या मैदानावर 587 धावा केल्याची नोंद आहे.

त्रिनिदाद मधील पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर विराटची बॅट चांगलीच बोलतोय. येथे त्याने 571 धावा केल्या आहेत.

विराट कोहली

पुण्याचे पाचवे असे मैदान आहे जिथे विराटने 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याने 97.34 च्या सरासरीने 551 धावा केल्यात. यात सहा वेळा अर्धशतक आणि तीन शतके ठोकली आहेत.

भारतीय क्रिकेट संघात मधल्या फळीचा भार उचलणाऱ्या विराट कोहलीने क्रिकेटच्या प्रत्येक मैदानावर एक विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. यंदाच्या विश्वचषकामध्ये तो जबरदस्त बॅटिंग करत आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्याने तीन सामन्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांसह 256 धावा काढल्या आहेत.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो सध्या रोहित शर्मा नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश विरुद्ध ठोकलेले हे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे 78 वे शतक ठरले. तसेच बांगलादेश विरुद्ध विश्वचषक स्पर्धेतले हे त्याचे दुसरे शतक होते.

Virat kohali taking catch

विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. 2011 मध्ये भारत आणि विश्वचषक जिंकला होता, तेव्हा विराट कोहली नुकताच संघामध्ये आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करत होता. आता मात्र विराट अनुभवी खेळाडू झाला असून भारताच्या बॅटिंगची संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा ही भारतात होत असल्याने हा विश्वचषक भारताला जिंकून देण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारताने यंदा विश्वचषक जिंकल्यास तो दोन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य ठरेल.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *