हे 4 दिग्गज खेळाडू आज क्रिकेटर नसते तर,ऑलिम्पिक मध्ये या खेळातून देशाला गोल्ड मेडल तर नक्कीच मिळवून दिले असते.

आपल्या देशात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. परंतु तुम्हाला माहितेय का आपल्या देशातील काही खेळाडूंना क्रिकेट आवडत सुद्धा न्हवते. त्यांना इतर खेळात रुची होती. परंतु क्रिकेट मध्ये ते आज जगभरात प्रसिद्ध आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे की जे आज क्रिकेटर नसते तर देशाला ऑलिम्पिक मध्ये नक्कीच गोल्ड मेडल जिंकून दिले असते जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
एबी डिव्हिलियर्स:-
दक्षिण आफ्रिका संघाचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्सला क्रिकेट खेळण्याचा आधी फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, पोहणे, रग्बी या खेळांमध्ये जास्त रस होता. एबी डिव्हिलियर्स ने आपल्या देशासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर हिस्सा सुद्धा घेतला. एबी डिव्हिलियर्स हा सर्वोत्तम टेनिसपटू असल्याचे केविन अँडरसनने मान्य केले होते. जर का एबी डिव्हिलियर्स आज क्रिकेटर नसता तर तो टेनिस स्टार नक्कीच झाला असता.
ब्रेंडन मॅक्युलम :-
ब्रेंडन मॅक्क्युलम हा न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अतिशय आक्रमक फलंदाज आहे ज्याने क्षेत्ररक्षणाचा कोन पूर्णपणे बदलून टाकला. मॅक्क्युलमला रग्बी खेळण्यात खूप रस होता. एवढेच नव्हे तर त्याने तीन वेळा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू डॅन कार्टरलाही हरवले आणि यावरून त्याची क्षमता कळू शकते.
महेंद्रसिंग धोनी:-
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनी ला ओळखले जाते. सुरुवातीपासून महेंद्रसिंग धोनीचा आवडता खेळ हा फुटबॉल होता. परंतु नंतर धोनी ने क्रिकेट मध्ये पदार्पण केले. आज धोनी क्रिकेटर नसता तर तो उत्कृष्ठ फुटबॉल पटू नक्कीच असता.
सौरव गांगुली
सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार होता शिवाय तो बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्षही आहे. तुम्हाला माहित आहे का की सौरव गांगुलीला फुटबॉलची खूप आवड होती. सौरव गांगुली आज क्रिकेटर नसता तर फुटबॉल खेळात गांगुली ने देशाचे नाव उज्ज्वल केले असते.