स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर याने त्याची निवृत्ती मागे घेतली आहे. मोहम्मद अमीरवर मॅच फिक्सिंगचे आरोप होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मध्ये होणाऱ्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून 2020 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. येणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. अमीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद, आसिफ, मोहम्मद अमीर यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. 2015 मध्ये लॉर्डस कसोटीत स्पॉट फिक्सिंग प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर 2010 ते 2015 मध्ये क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. सलमान बट आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. तर पुढे मोहम्मद आमिरने क्रिकेटमध्ये 2016 मध्ये कमबॅक केले.
आपल्या धारदार गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या या खेळाडूची लव्ह स्टोरी वेगळी आहे. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या पाकिस्तानी खेळाडूची पत्नी नर्जिस खान ब्रिटिश नागरिक आहे. 2010 मध्ये मोहम्मद अमीरला स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे जेलमध्ये जावे लागले होते. त्यावेळी त्याची केस लढण्यासाठी मूळ पाकिस्तान असलेली ब्रिटिश नागरिक नर्जिस खान हिने वकीलपत्र घेतले होते.
या केसच्या निमित्ताने दोघांमध्ये जवळीकता आल्याने त्यांच्या दोघात मैत्रीचे संबंध वाढले. अमीर आणि नर्जिस यांचे मैत्रीचे रूपांतर पुन्हा प्रेमात झाले. 2015 पर्यंतची जेलची सजा संपल्यानंतर तो बाहेर आला. 2016 मध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्याच वर्षी त्या दोघांचा विवाह झाला.
जून 2024 मध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे संयुक्तरीत्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी संघात मोहम्मद अमीरची निवड झाली नसून केवळ त्याने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पीसीबीने विश्वचषक स्पर्धेसाठी 29 खेळाडूंची कॅम्पसाठी निवड केली आहे. त्यामध्ये मोहम्मद अमीरचा समावेश आहे.
32 वर्षीय मोहम्मद आमिरने 2009 ते 2011 दरम्यान पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने खेळले असून त्यात 119 बळी घेतले आहे तर 61 वनडे सामन्यात 81 बळी घेतल्याची नोंद आहे. टी 20 क्रिकेट मध्ये 50 सामन्यात 59 बळी घेतले होते. अमीरची गणना पाकिस्ताननातल्या धुरंदर वेगवान गोलंदाजांशी होते.
2017 मधील चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करण्यामध्ये या वेगवान गोलंदाजाचा महत्त्वपूर्ण हात होता. आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर त्याने भारतीय फलंदाजांना जेरीस आणले होते. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरच पाकिस्तानने भारतावर मोठा विजय मिळवला होता.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.