युवा खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी..! प्रखर चतुर्वेदीने रचला इतिहास, क्रिकेटच्या एका डावात ठोकल्या तब्बल 400 हून अधिक धावा..

History Created..'भारतीय खेळाडूने रचला इतिहास, क्रिकेटच्या एका डावात ठोकल्या तब्बल 400 हून अधिक धावा..

History Created.: भारतीय फलंदाज 404 धावांचा विक्रम रचला इतिहास: कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा गाठण्याचा पराक्रम वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ब्रायन लारा याने एकदाच केला आहे. त्याच्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणीही हे करू शकले नाही. जर आपण प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोललो तर असे 10 वेळा घडले आहे. यामध्ये एकदा भारतीय खेळाडूने रणजी ट्रॉफीदरम्यान असा पराक्रम केला होता. आता आणखी एका भारतीयाने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये इतिहास रचला आणि 404 धावांची नाबाद आणि ऐतिहासिक खेळी खेळली.

कोण आहे तो तरुण स्टार?

कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने ठोकल्या तब्बल 400 हून अधिक धावा..

कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने कूचबिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याने मुंबईविरुद्ध 404 धावांची ऐतिहासिक आणि नाबाद खेळी खेळली. या सामन्यात प्रखरने 638 चेंडूंचा सामना करत 404 नाबाद धावा केल्या. त्याच्या खेळीत 46 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

तो कूचबिहार ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. या खेळीने त्याने इतिहास रचला आणि विक्रमांच्या यादीत आपले नाव कोरले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये म्हणजेच लाल बॉल क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे भारतीय

  1. भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर- 443 नाबाद, विरुद्ध काठियावाड, पुणे 1948 (रणजी)
  2. प्रखर चतुर्वेदी- ४०४ नाबाद, विरुद्ध मुंबई, २०२३-२४ (कूचबिहार ट्रॉफी)
  3. पृथ्वी शॉ- 379, विरुद्ध आसाम, 2022-23 (रणजी करंडक)
  4. संजय मांजरेकर- 377, विरुद्ध हैदराबाद, 1991 (रणजी करंडक)
  5. मातुरी वेंकट श्रीधर- 366, विरुद्ध आंध्र, 1994 (रणजी करंडक)

History Created..'भारतीय खेळाडूने रचला इतिहास, क्रिकेटच्या एका डावात ठोकल्या तब्बल 400 हून अधिक धावा..

या सामन्याची स्थिती काय होती?

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम खेळताना मुंबई संघाने 380 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कर्नाटकने पहिल्या डावात 8 गडी गमावून 890 धावांची मजल मारली. या डावात सलामीपासून शेवटपर्यंत खेळताना प्रखर चतुर्वेदीने नाबाद ४०४ धावा केल्या. तर हर्षिल धर्मानीने १६९ धावांची खेळी केली. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड या डावात केवळ 22 धावा करू शकला.


हेही वाचा:

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *