आयपीएलच्या धामधुमीत रणजी क्रिकेटमधला ‘रनमशीन’ चढला लग्नाच्या बोहल्यावर, या स्टार क्रिकेटपटू ने उरकला विवाह..!

आयपीएलच्या धामधुमीत रणजी क्रिकेटमधला 'रनमशीन' चढला लग्नाच्या बोहल्यावर, या स्टार क्रिकेटपटू ने उरकला विवाह..!

भारतात एकीकडे आयपीएलची धूमधाम सुरू आहे तर दुसरीकडे रणजी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडणारा प्रियांक पांचाल याने नुकतेच लग्न केले आहे. गुजरात टीमचा माजी कर्णधार स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट कालना शुक्ला हिच्या सोबत रेशीमगाठ बांधली आहे. पांचालने त्याच्या लग्नाचे 5 फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. फोटोमध्ये हे जोडपे जबरदस्त दिसत आहे.

लग्नाचे फोटो प्रियांकाने शेअर केल्यानंतर त्याचे सहकारी मित्र व्यंकटेश अय्यर आणि युजवेंद्र चहल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. instagram वर केलेला शेअर केलेल्या फोटो सोबत प्रियांक ने लिहिले की, वचनाने भरलेल्या हृदयासोबत आम्ही प्रेमाच्या खुप सुंदर यात्रेत आमच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहोत. आम्ही आमची कहाणी आपल्या सोबत शेअर करण्यासाठी खूप उत्साहीत आहोत. प्रियांक आणि कालना! आमचा परिवार आमच्यासाठी आनंदीत आहे.

आयपीएलच्या धामधुमीत रणजी क्रिकेटमधला 'रनमशीन' चढला लग्नाच्या बोहल्यावर, या स्टार क्रिकेटपटू ने उरकला विवाह..!

गुजरातच्या या माजी कर्णधाराने मागील वर्षी अहमदाबाद येथील क्रीडा मनसोपचारतज्ञ् कालना शुक्ला हिच्या सोबत साखरपुडा केला होता. प्रियांक आणि कालना हे अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले.

प्रियांक ने लग्नाच्या बाबतीत प्रतिक्रिया देताना म्हणाला की, “आम्ही खूप वर्षापासून एकमेकांना ओळखत होतो. कालना ने मला खूप सारी मदत केली आहे. जसे की शारीरिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी आपण जिम मध्ये प्रशिक्षण करत. त्याचबरोबर डोक्याला देखील प्रशिक्षित करणे महत्त्वाचे असते. स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार लग्न समारंभाचा हा कार्यक्रम दोन दिवस चालला. 28 मार्च रोजी लग्न आणि रिसेप्शन झाले.

आयपीएलच्या धामधुमीत रणजी क्रिकेटमधला 'रनमशीन' चढला लग्नाच्या बोहल्यावर, या स्टार क्रिकेटपटू ने उरकला विवाह..!

2021 मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रियांची भारताच्या राष्ट्रीय संघामध्ये रोहित शर्माच्या जागेर निवड झाली होती. मात्र अंतिम 11 जणांमध्ये त्याचे सिलेक्शन झाले नव्हते. त्यामुळे त्याचे पदार्पण लांबले.

फर्स्ट क्लास क्रिकेटचा विचार केला तर 120 सामन्यात 45.52 च्या सरासरीने 8,423 धावा केल्या आहेत. त्यात 27 शतके आणि 33 अर्धशतके त्याने ठोकली आहेत. त्रिशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचे देखील नाव आहे. नाबाद ३१४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. 59 टी 20 सामन्यांमध्ये त्याने1522 धावा केल्या आहेत.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…