अपघात झाला तेव्हा रिषभ पंत ला मदत करण्याएवजी त्याच्या गाडीतील पैश्याची बॅग घेऊन पळाले उत्तराखंडमधील तरुण,बॅग पैश्याशिवाय होत्या ह्या मोल्यवान वस्तू..!
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून रुरकीला येत असताना मोठा अपघात झाला. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याच्या कारला अपघात झाला आणि आग लागली.
ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले आहे. मात्र अपघातादरम्यान पोहोचलेल्या काही तरुणांनी ऋषभला मदत केली नाही आणि त्याच्या बॅगेतील पैसे घेऊन पळ काढला.
View this post on Instagram
नरसन सीमेवर ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे मातीचा ढीग होता. या ढिगाऱ्याच्या धडकेत ऋषभची कार आली आणि अनियंत्रित झाल्यामुळे अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी कुशल वीर यांनी सांगितले की, ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने येत असताना अचानक त्याची कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली.

यानंतर कार अनियंत्रित झाली आणि रेलिंगचे खांब तोडत कार सुमारे 200 मीटर घासत पुढे गेली. यादरम्यान कार अनेक वेळा उलटली आणि कारने पेट घेतला. टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये भरती, समोर आले मोठे कारण..
अपघात झाला तेव्हा ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुखापतीमुळे तो बाहेर पडू शकला नाही. त्याच्याकडे एक बॅगही होती. त्याचवेळी अपघातस्थळी पोहोचलेल्या काही तरुणांनी ऋषभला मदत न करता त्याच्या बॅगेतील पैसे काढून तेथून पळ काढला.
ऋषभ पंत के कार एक्सीडेंट का CCTV…#pant #RishabhPant pic.twitter.com/CwYzzepeTO
— Khushboo Singh (@imprincy_singh) December 30, 2022
जेव्हा रिषभचा अपघात झाला तेव्हा रोडच्या बाजूला एक तरूण मुलांचा ग्रुप खेळत होते. ज्यात 5/6 तरूण असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी रिषभच्या गाडीतील बॅग घेऊन त्यातील पैसे आणि मोल्यवान वस्तू घेतल्या आणि बॅग जागीच सोडून दिली. त्यांतर त्यांनी स्वतःच लांब जावून पोलीस आणि रुग्णवाहिका बोलावली..
उपचाराचा सर्व खर्च उत्तराखंड सरकार उचलणार!
वाहन अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्यावर योग्य उपचार व्हावेत, अशा सूचना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांकडून घेतल्यानंतर दिल्या आहेत.