विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा हिस्सा असलेल्या या 28 वर्षीय क्रिकेटरचा झाला मृत्यू , रविचंद्र अश्विनसह अनेक दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केला शोक..
हिमाचल प्रदेशसाठी विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा युवा क्रिकेटर सिद्धार्थ शर्माने जगाचा निरोप घेतला आहे. हा खेळाडू फक्त 28 वर्षांचा होता. सध्या रणजी ट्रॉफी खेळली जात असून सिद्धार्थ हिमाचल संघाचा सदस्यही होता. मात्र प्रदीर्घ आजारपणामुळे या खेळाडूला लहान वयातच जगाचा निरोप घ्यावा लागला.
सिद्धार्थ बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. गेल्या 2 आठवड्यांपासून तो आजारपणामुळे खेळापासून दूर होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्येच तो बरा झाल्याच्या बातम्याही आल्या.

मात्र अचानक या खेळाडूची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली. सिद्धार्थने गुजरातमधील वडोदरा येथे अखेरचा श्वास घेतला. तो तेथे रणजी सामना खेळण्यासाठी गेला होता.
मुख्यमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनीही सिद्धार्थच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेशच्या सीएमओने ट्विट केले की, “मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राज्याचा स्टार वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, जो हिमाचल प्रदेशच्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या क्रिकेट संघाचा सदस्य होता.” मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री @SukhuSukhvinder ने हिमाचल की विजय हजारे ट्रॉफी विजेता क्रिकेट टीम के सदस्य रहे और प्रदेश के स्टार तेज गेंदबाज सिद्धार्थ शर्मा के निधन पर गहरा शोक व्यक्त किया है। मुख्यमंत्री ने शोक संतप्त परिजनों के साथ अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त की हैं।
— CMO HIMACHAL (@CMOFFICEHP) January 13, 2023
सिद्धार्थ ची कारकीर्द
सिद्धार्थची देशांतर्गत कारकीर्दही फार काळ टिकली नाही. त्याने लिस्ट-ए मध्ये 6 सामने तर एक टी-20 सामना खेळला. हिमाचल संघ 2021-22 मध्ये विजय हजारे ट्रॉफीचा चॅम्पियन बनला होता, तेव्हा सिद्धार्थ शर्माचाही त्या संघात समावेश होता.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…