एकदिवशीय क्रिकेटमध्ये येत्या काही काळात तिहेरी शतक ठोकू शकतात ‘हे’ 4 खेळाडू, एकजण तर येणाऱ्या वर्ल्डकपमध्येच करू शकतो अशी कामगिरी..!
एकदिवसीय क्रिकेट, क्रिकेटचा असा प्रकार, ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना लांबलचक उच्च स्कोअरिंग सामने आणि मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो.जेव्हापासून T20 क्रिकेटने क्रिकेटच्या विश्वात प्रवेश केला आहे, तेव्हापासून क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. कसोटी असो किंवा वनडे क्रिकेट, सर्वच क्रिकेटपटू जलद धावा करण्यावर विश्वास ठेवतात.
भारतीय संघाचा सलामीवीर, कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 264 धावांची अविस्मरणीय खेळी केल्यापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणी कधी तिहेरी शतक करू शकेल का, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रोहित शर्मा हा विक्रम करण्यापासून केवळ 36 धावा दूर राहिला होता. अंतर त्यानंतर पुन्हा टीम इंडियाच्या अनेक युवा खेळाडूंनी 200+ धावा केल्या,. ज्यामध्ये सलामीवीर शुभमन गिल आणि ईशान किशन यांचाही समावेश आहे.. यावरूनच सध्या टीम इंडियातील आणि अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असे कोणते खेळाडू आहेत जे एकदिवशीय क्रिकेटमध्ये ३०० धावांचा आकडा पार करू शकतात याचे अनुमान लावले जात आहे..
आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये अश्याच 3 खेळाडूंचे नावे सांगणार आहोत, जे एकदिवशीय सामन्यात 300 धावा करण्याचा विक्रम करू शकतात. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू?..
मार्टिन गप्टिल(martin guptill):
न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल. मार्टिन गप्टिलची गणना जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. मार्टिन गप्टिलने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 179 सामने खेळले असून 16 शतकेही नोंदवली आहेत. एवढेच नाही तर मार्टिन गप्टिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही ठोकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 237* आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मार्टिन गप्टिलचे नावही येते.
डेव्हिड वॉर्नर (DEVID Warner):
ऑस्ट्रेलियाचा झंझावाती सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा देखील या यादीमध्ये सामील आहे. डेव्हिड वॉर्नरही आक्रमक फलंदाजीच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. डेव्हिड वॉर्नरची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान फलंदाजांमध्ये केली जाते.
डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर डेव्हिड वॉर्नरची सर्वोत्तम धावसंख्याही १७९ आहे. होय! आतापर्यंत डेव्हिड वॉर्नरला एकही द्विशतक झळकावता आलेले नाही, पण तो असा खेळाडू आहे जो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 चा आकडा नक्कीच पार करू शकतो.
रोहित शर्मा(Rohit Sharma)
भारतीय संघाचा सलामीवीर आणि संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे ज्याने एक नव्हे तर 3 द्विशतके झळकावली आहेत आणि रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा पहिला फलंदाज बनू शकतो. रोहित शर्माची 208, 209 आणि 264 धावांची अतुलनीय खेळी अजूनही लोकांच्या मनात ताजी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 218 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27 शतके झळकावली आहेत आणि लवकरच त्याच्या बॅटमधून एक अप्रतिम त्रिशतक येईल अशी अपेक्षा आहे.
फखर जमान (Fakar Zaman):
या यादीत पाकिस्तानचा महान फलंदाज फखर जमानचेही नाव आले आहे. नुकतेच या खेळाडूने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावून सर्वांना चकित केले होते.या खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 44 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 45.70 च्या सरासरीने 1,828 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये या खेळाडूने 4 शतके आणि 11 अर्धशतके केली आहेत.
एकदिवसीय सामन्यांमध्ये झमानची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 210 आहे. त्याची धमाकेदार कामगिरी पाहता हा खेळाडू आगामी काळात त्रिशतक झळकावू शकतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवाय फकर जमान हा एकदिवशिय क्रिकेटमधील पाकिस्तानसाठी सर्वांत जास्त काळ क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे येत्या 3/4 वर्षात जर त्याने तिहेरी शतक ठोकले तर आच्छर्य नको वाटायला..
तर मित्रांनो हे होते काही खेळाडू जे एकदिवशीय क्रिकेटमध्ये लवकरच तिहेरी शतक ठोकू शकतात. तुम्हाला काय वाटत वरीलपैकी किंवा आणखी असा कोणता खेळाडू आहे जो हा विक्रम पहिल्यांदा आपल्या नावावर करू शकतो. कमेंट करून नक्की कळवा.. आणि अश्याच ट्रेंडीग न्यूज वाचण्यासाठी फोलो करायला विसरू नका..
हेही वाचा: