Cricketer who don’t like Drink: भारतीय संघाच्या या 4 खेळाडूंनी एकदाही पिली नाहीये दारू, करतात तिरस्कार; एक तर आहे सर्वांचा लाडका..!

0
6
 Cricketer who don't like Drink: भारतीय संघाच्या या 4 खेळाडूंनी एकदाही पिली नाहीये दारू, करतात तिरस्कार; एक तर आहे सर्वांचा लाडका..!

Cricketer who don’t like Drink: पार्ट्यांमध्ये ड्रिंक्स घेऊन सेलिब्रेशन करण्याची भारतीय क्रिकेट टीममध्ये खूप जुनी संस्कृती आहे. अनेक क्रिकेटपटूंना मद्यपान करायला आवडते. मात्र, टीम इंडियामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांना दारूच्या नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. टीम इंडियाचे 4 खेळाडू असे आहेत जे ड्रग्जपासून दूर राहतात. अशाच 4 भारतीय क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया ज्यांनी कधीही दारूचे सेवन केले नाही.

 Cricketer who don’t like Drink: या ४ खेळाडूंनी कधीही पिली नाहीये दारू!

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi)

1. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी एकूण 21 कसोटी सामने, 121 एकदिवसीय सामने आणि 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भुवनेश्वर कुमारने 21 कसोटी सामन्यांमध्ये 63 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, त्याने 121 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 141 विकेट्स आणि 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 बळी घेतले आहेत. भुवनेश्वर कुमार हा स्वच्छ प्रतिमेचा क्रिकेटपटू राहिला आहे. भुवनेश्वर कुमारला दोन्ही बाजूंनी चेंडू कसा स्विंग करायचा हे माहीत आहे. भुवनेश्वर कुमारने आपल्या चमकदार कामगिरीने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल एक रंजक  गोष्ट सांगतो की , तो दारूचे सेवन करत नाही. IPLLATESTNEWS च्या वृत्तानुसार, भुवी दारू पीत नाही आणि धूम्रपानही करत नाही. त्याने आजपर्यंत कधीही दारूला हात देखील लावला नाहीये..

2. राहुल द्रविड (Rahul Dravid)

 Cricketer who don't like Drink: भारतीय संघाच्या या 4 खेळाडूंनी एकदाही पिली नाहीये दारू, करतात तिरस्कार; एक तर आहे सर्वांचा लाडका..!

राहुल द्रविड (Rahul Dravid) हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने काही काळ भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. राहुल द्रविडने भारतीय संघासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 52.31 च्या उत्कृष्ट सरासरीने 13288 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.16 च्या सरासरीने 10889 धावा केल्या आहेत. भारतीय संघाची भिंत म्हटल्या जाणाऱ्या राहुल द्रविडची प्रतिमा एका सज्जन व्यक्तीची आहे आणि भारताच्या या सज्जन क्रिकेटपटूने कधीही ड्रग्ज घेतलेले नाही. IPLLATESTNEWS ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल द्रविडने कधीही स्मोकिंग केले नाही आणि त्याचा दारूशी आजपर्यंत संबंध आला नाही.

3. गौतम गंभीर (Gautam Gambhir)

गौतम गंभीर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी विराजमान, 5 वर्षात तब्बल एवढ्या आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या संधी..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) देखील ड्रग्जच्या व्यसनापासून दूर आहे. starsunfolded.com ने दिलेल्या वृत्तानुसार, गौतम गंभीर देखील स्मोकिंग किंवा मद्यपान करत नाही. त्याने एकदा दारू पिल्याचे कबूल केले असले तरी तो अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर आहे. गौतम गंभीरने भारतीय संघासाठी 58 कसोटी सामने, 147 एकदिवसीय सामने आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 58 कसोटींमध्ये त्याने 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या.

 

4. परवेझ रसूल (Parvez Rasool)

देशांतर्गत सामन्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे कर्णधार असलेलापरवेझ रसूल (Parvez Rasool) हा भारतीय संघाकडूनही खेळला असून तोही अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर आहे. परवेझ रसूलच्या भारतीय संघातील विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या क्षमतेनुसार यात काही विशेष नाही. परवेझ रसूलने टीम इंडियासाठी एक वनडे आणि एक टी-20 सामना खेळला आहे. परवेझ रसूलला एकदिवसीय सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही पण टी-20 सामन्यातही त्याला केवळ 5 धावा करता आल्या. पण, परवेझ रसूलची गणना देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते, त्याने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 82 सामन्यांमध्ये 37.85 च्या सरासरीने 4807 धावा केल्या आहेत आणि 266 बळीही घेतले आहेत.


हे ही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here