ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
आजच्या या विशेष लेखामध्ये आम्ही तुम्हाला कसोटी क्रिकेटमधील शेवटच्या डावामध्ये शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांविषयी माहिती देणार आहोत. चला तर सुरवात करूया या लेखाला.. या यादीमध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या डावात शून्यावर बाद झाले होते हे दिग्गज खेळाडू
1.ब्रायन लारा
वेस्टइंडीजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा हा त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला होता. 2006 मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने त्याच्या कारकिर्दीतला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. डाव्या हाताने फलंदाजी करणारा लारा कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावामध्ये सर्वाधिक 400 धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
2.मुरली विजय
भारताचा सलामीचा फलंदाज मुरली विजय याने 2018 मध्ये त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाला. भारतातर्फे त्याने 61 कसोटी सामन्यात 3982 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी 17 वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
आयपीएल मध्ये देखील त्याची आकडेवारी दमदार आहे. IPL मध्ये 106 सामन्यात 2619 धावा केल्याची नोंद आहे. 29 जानेवारी 2023 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
3.शिवनारायण चंद्रपॉल
वेस्टइंडीज चा माझी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल यांनी 2015 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता इंग्लंड विरुद्ध या झालेल्या सामन्यांमध्ये त्याला भोपळा देखील फोडता आला नाही. शिवनारायण चंद्रपॉल आणि त्यांचा मुलगा तेज नारायण चंद्रपाल या पिता- पुत्राची जोडी एक साथ क्रिकेट खेळले आहेत. क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले होते की पिता-पुत्र एकत्र क्रिकेट खेळत होते.
4.हाशिम अमला
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमला याने त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात शून्य धावसंख्येवर बाद झाला होता 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना तो शून्यावर बाद झाला. दक्षिण आफ्रिका संघाकडून त्याने 124 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते त्यात त्याच्या नावावर 9282 धावाची नोंद आहे.
5. यशपाल शर्मा
1983च्या विश्व विजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा हे देखील त्यांच्या शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाले होते. 1983 साली वेस्टइंडीज विरुद्ध त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते बरेच वर्ष समालोचन करत होते. तसेच भारतीय क्रिकेट निवड समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते.
6.मायकल वान
इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज मायकल वान याने 2008 मध्ये त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या या सामन्यात त्याला भोपळा देखील फोडता आला नाही. क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत दिसू लागला. तो वादग्रस्त विधाने करण्यामध्ये प्रसिद्ध आहे.
7.अँड्रू सायमन्स
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू सायमन्स याने 2008 मध्ये त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात तो शून्य धावसंख्येवर माघारी परतला होता. त्याचे मागील वर्षी एका भीषण कार अपघातात दुःखद निधन झाले होते.
8.सुरेश रैना
भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यांमध्ये त्याला एकही धाव काढता आली नाही. तो शून्यावर बाद झाला. त्याने आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल मधील धडाकेबाज कामगिरी केली आहे.
9.शोएब मलिक
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक इंग्लंड विरुद्ध त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता 2015 साली झालेल्या या कसोटी सामन्यात त्याला एकही धाव काढता आली नाही. तो सध्या प्रोफेशनल टी-20 लीग मध्ये खेळत असतो.
वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू मालोर्न सॅम्यल्स याने पाकिस्तान विरुद्ध 2016साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. शेवटच्या डावात त्याची कामगिरी निराशा जनक होती. अखेरच्या डावात तो शून्यावर बाद झाला. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.