क्रिकेट हा एकमात्र खेळ आहे ज्याची पुरी दुनिया दिवाणी आहे. आपल्या देशात सर्वात जास्त पैसा हा दोन क्षेत्रात आहे एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरे म्हणजे बॉलिवूड. सामान्य लोकांपेक्षा क्रिकेटर आणि अभिनेत्यांचे जीवनशैली मध्ये प्रचंड फरक आहे त्याचे उच्च राहणीमान, महागडी घरे गाड्या इत्यादी. क्रिकेटर तर क्रिकेट खेळून त्याचशिवाय जाहिराती करून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे कमवतात तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील अश्या खेळाडूं बद्दल सांगणार आहे जे की सरकारी नोकरी सुद्धा करतात.
1) सचिन तेंडुलकर:-
भारतीय क्रिकेट संघातील मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांना Gods of cricket असे सुद्धा संबोधले जाते. सचिन तेंडुलकर ने आयुष्यातील 23 वर्ष क्रिकेट मध्ये दिली यामध्ये सचिन तेंडुलकर ने अनेक इतिहास आणि रेकॉर्ड आपल्या नावी केले. तसेच सचिन तेंडुलकर 100 शतके मारणारे जगातील एकमेव फलंदाज आहेत. याचबरोबर सचिन तेंडुलकर भारतीय वायू सेनेत ग्रुप कॅप्टन हे पद देऊन सन्मानित केले होते.
2) महेंद्रसिंग धोनी:-
भारतीय क्रिकेट संघातील सर्वात अनुभवी आणि चलाख खेळाडू म्हणून महेंद्र सिंग धोनी ला ओळखले जाते. महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज होताच त्याचबरोबर तो एक अष्टपैलू क्रिकेपटू सुद्धा होता. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी ला समजले जाते. महेंद्रसिंग धोनी ची लहानपणी पासून इच्छा होती की भारतीय सेनेत जायचं. धोनीची ती इच्छा 2015 सालि पूर्ण झाली. महेंद्रसिंग धोनीला भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल या पदावर नियुक्त केले.
3) लोकेश राहुल:-
लोकेश राहुल भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्वाचा घटक आहेत. लोकेश राहुल भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज त्याच बरोबर एक उत्कृष्ट विकेट किपर सुद्धा आहे. 2023 च्या वर्ल्ड कप मद्ये लोकेश राहूल सर्वांना आपल्या फलंदाजी ने आकर्षित केले होते. सध्या लोकेश राहुल रिझर्व्ह बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर सुद्धा कार्यरत आहे.
4) हरभजन सिंग:-
भारतीय क्रिकेट संघातील माजी गोलंदाज म्हणून हरभजन सिंग म्हणजेच भज्जी ला ओळखले जाते.अतिशय आक्रमक गोलंदाजी करत हरभजन सिंग ने 400 पेक्षा ही जास्त सध्या विकेट आपल्या नावी केल्या आहे.अनेक दिग्गज खेळाडूंना भज्जी ने बाद केले आहे.सध्या हरबजन सिंग पंजाब पोलीस मध्ये DCP या पदावर कार्यरत आहे.
हे ही वाचा:- .भारतीय क्रिकेट संघात कोणत्या खेळाडूला सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच मिळाले, जाणून घ्या विराट कोहली कितव्या स्थानी आहे.