4 खेळाडू जे एखाद्या चित्रपटात भुताचा रोल अतिशय प्रभावीपने करू शकतात, एकाने तर भर मैदानात केला होता अभिनय..
क्रिकेटच्या मैदानात खेळाडू नेहमीच त्यांच्या खेळामुळे चर्चेत असतात. आपल्या स्टायलिश लूकने प्रेक्षकांना वेड लावणारे अनेक खेळाडू आहेत. अनेक क्रिकेटर्सवर बायोपिकही बनवण्यात आले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, हॅन्सी क्रोनिए यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे, परंतु क्रिकेटच्या इतिहासात असे ही काही खेळाडू होऊन गेले जे मैदानावर एखाद्या भयानक राक्षसापेक्षा कमी दिसत नाहीत. इतकंच नाही तर त्यांना एखाद्या चित्रपटात भूताची भूमिका दिली तर तो त्यातही बसू शकतो. आज आपण अशा पाच खेळाडूंबद्दल पाहणार आहोत, जे भूताची भूमिका योग्य प्रकारे निभावू शकतात.
मुथय्या मुरलीधरन: मुथय्या मुरलीधरन, श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू ज्याने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने सर्व विरोधी फलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली, त्याला क्रिकेटच्या मैदानावर कोणत्याही परिचयाची गरज नाही, त्याची गोलंदाजी कोणत्याही फलंदाजासाठी भीतीदायक ठरली, कारण जेव्हा तो चेंडू फेकायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भूतापेक्षा कमी भासत नाही.

अनेक चाहत्यांनी त्याची तुलना भूताशीही केली आहे. आता त्याला एखाद्या चित्रपटात भुताची भूमिका दिली तर तो त्यातही यशस्वी होऊ शकला असता.
इशांत शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) देखील त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. त्याच्या लांब केस आणि मस्त स्टाईलमुळे इशांत शर्मा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो, पण एक प्रसंग असा आला की, चाहत्यांनी त्याला भितीदायक प्रतिमा असलेला खेळाडू म्हटले. वास्तविक, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाच्या भारत दौऱ्यात इशांत शर्माने एक अतिशय भीतीदायक कृत्य केले होते.
एका कसोटी सामन्यादरम्यान त्याचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. यादरम्यान त्याने स्मिथकडे असा चेहरा केला, जो पाहून दोघेही हसले आणि त्याच वेळी थोडे घाबरले. यानंतर चाहत्यांनी त्याची जोरदार खिल्ली उडवली. या संदर्भात, इशांत शर्मा भूताच्या भूमिकेसाठी योग्य ठरू शकतो,असे चाहत्यांचे मत झाले होते.
ख्रिस गेल (Chris Gayle) : वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर आणि आपल्या धडाकेबाज फलंदाजीने जागतिक क्रिकेटच्या तमाम गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा ख्रिस गेल (Chris Gayle) सुद्धा त्याच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. तो त्याच्या मजेशीर शैलीसाठी तसेच भितीदायक कृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. या संदर्भात ख्रिस गेलही भुताची भूमिका अगदी चोख बजावू शकतो. कित्येक वेळा त्याने मैदानावर अशी काही कृत्य केली आहेत जे पाहून चाहत्यांनी त्याची तुलना भूतांसोबत केली आहे.
लसिथ मलिंगा (Lasith Malinga): या यादीत श्रीलंका क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे नावही आहे. मलिंगासुद्धा त्याच्या लूकमुळे खूप चर्चेतही असतो. मलिंगा नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीने मैदानात उतरत असतो. त्याची बॉलिंग अॅक्शनही खूप भीतीदायक आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या घातक गोलंदाजीने अनेक फलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली आहे. त्याची काही भावमुद्रा पाहता जर मलिंगाला चित्रपटात भूताची भूमिका दिली तर तो अतिशय प्रभावी पने पार पाडेल याची खात्री पटते.
टीप : आमचा उद्देश कोणत्याही क्रिकेटपटू, चाहता इत्यादींच्या भावना दुखावण्याचा नाही. हा लेख फक्त मनोरंजनासाठी लिहिला आहे. त्याचा कोणत्याही व्यक्तीशी, घटनेशी किंवा वस्तूशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..