हार्दिक पंड्याच नाही तर या पाकिस्तानी खेळाडूनेही एकाच मुलीशी केलय दोन वेळा लग्न, त्यामागचे कारण मात्र जरा वेगळंय..!
हार्दिक पंड्याच नाही तर या पाकिस्तानी खेळाडूनेही एकाच मुलीशी केलय दोन वेळा लग्न, त्यामागचे कारण मात्र जरा वेगळंय..!
काही दिवसापूर्वी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू आणि T20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने आपली पत्नी नताशासोबत दुसर्यांदा विवाह केला. पंड्या आणि नताशा यांचे लग्न याआधीही एकदा झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पंड्या हा काही एकमेव असा क्रिकेटर नाहीये ज्याने दुसर्यांदा एकाच मुलीशी लग्न केलय. याआधी सुद्धा अशी घटना घडलेली आहे ज्यात एका क्रिकेटरने एकाच मुलीशी दोन वेळा लग्न केले आहे.
आज आम्ही तुम्हाला क्रिकेटपेक्षाही वादांमुळे चर्चेत असलेला पाकिस्तानी गोलंदाज ‘मोहम्मद आमिर’चा असाच एक रंजक किस्सा सांगणार आहोत, जो फार कमी लोकांना माहीत असेल. फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर मोहम्मद अमीरने पुनरागमन केले. सहसा प्रत्येक क्रिकेटप्रेमीला ही गोष्ट माहीत असेल. आपल्या धारदार गोलंदाजीमुळे या गोलंदाजाने जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला.

आमिरवर ऑगस्ट 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता. जेव्हा पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याला तुरुंगातही जावे लागले होते, तसेच त्याच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंदी आल्यानंतर त्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तथापि, त्याने केवळ जबरदस्त पुनरागमन केले नाही तर आपल्या कामगिरीने समीक्षकांच्या मुसक्या आवळल्या. (या 4 भारतीय खेळाडूंनी वनडेच्या एका षटकात ठोकल्यात सर्वाधिक धावा, एकाने तर तब्बल दोन वेळा केलाय पराक्रम…)
आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या मनोरंजक किस्साविषयी सांगत आहोत. वास्तविक, आमिर हा पाकिस्तानचा असा खेळाडू आहे ज्याने एकाच मुलीशी दोनदा लग्न केले. आमिरने पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश तरुणी नर्जिस खानशी लग्न केले आहे, जी पेशाने वकील आहे. पण काही कारणावस्तव अमीरला दोनदा नर्जिसशी लग्न करावे लागले.
अशी आहे दोघांची प्रेमकहाणी…
आमिर आणि नर्जिसची प्रेमकहाणी २०१० मध्ये सुरू झाली होती. लंडनमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. प्रेमकहाणी सुरू झाल्यानंतर दोघांनी सप्टेंबर 2014 मध्ये लग्न केले. पण नेमक त्यावेळी आमिरला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बंदीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कोणताही मोठा कार्यक्रम झाला नाही आणि लोकांना या लग्नाची माहिती मिळू शकली नाही.
5 वर्षांची बंदी संपल्यानंतर आमिरने 2016 साली पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा थाटामाटात लग्न केले. दुसऱ्या लग्नात पाकिस्तानात सलग तीन दिवस तीन फंक्शन्स होत्या. आमिरने एका मुलाखतीत आपल्या लग्नाविषयी सांगितले होते की, ‘हा प्रेमविवाह आहे, परंतु दोघांच्याही कुटुंबीयांच्या संमतीने हा विवाह झाला होता. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांमध्ये नर्जिस नेहमीच माझ्यासोबत होती.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..