सूर्यकुमार यादवचं नाही तर हे स्टार खेळाडू सुद्धा सलग 3 सामन्यात झाले होते शून्यावर बाद, एकजन तर आहे अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडु..
सूर्यकुमार यादवचं नाही तर हे स्टार खेळाडू सुद्धा सलग 3 सामन्यात झाले होते शून्यावर बाद, एकजन तर आहे अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडु..
क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजाला सर्वात मोठा धक्का म्हणजे शून्य धावसंख्येवर बाद होणे. खाते न उघडताच बाद झाल्यानंतर फलंदाजांना सर्वात वाईट वाटते. कोणत्याही फलंदाजाला त्याच्या कारकिर्दीत शून्यावर बाद व्हायचे नसते. मात्र काही खेळाडूंच्या नावावर नकोसे विक्रम होत असतात.
काल परवाच टिम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव (Surayakumar Yadav) औस्ट्रोलियाविरूद्धच्या एकदिवशीय मालिकेतिल तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. हा नकोसा विक्रम सूर्याच्या नावावर झाल्याने चाहते त्याच्यावर प्रचंड संतापले असून त्याला संघातून काढून टाकण्याची मागणी केली जातेय. मात्र क्रिकेटमध्ये अस सलग शून्यावर 3 वेळा बाद होणारा सूर्या एकमेव खेळाडू नाहीये. याआधी देखील अनेक क्रिकेटपटू या नकोशा विक्रमाचा बळी ठरले आहेत.

काही क्रिकेटपटूही असे आहे. जे सलग सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत. इतकंच नाही तर काही फलंदाज सलग 3 सामन्यात शून्याच्या स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पोहोचले आहेत. कोणत्याही फलंदाजासाठी हा विक्रम करणे खूप लाजिरवाणे आहे.
आज आम्ही तुम्हाला त्या 4 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. जे सलग 3 सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत. या यादीत काही दिग्गज खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. या यादीत एका भारतीय खेळाडूचाही समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू..
मोहम्मद हाफीज : या यादीत पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू मोहम्मद हाफीजचे नाव समाविष्ट आहे. तसेच सलग 3 टी-20 सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. 2012 मध्ये तो इंग्लंडविरुद्ध सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला.
मोहम्मद हाफिजने पाकिस्तानसाठी 55 कसोटी सामन्यांमध्ये 3652 धावा केल्या आहेत आणि 53 बळीही घेतले आहेत. 218 एकदिवसीय सामन्यांमध्ये हाफिजने 6614 धावा केल्या आणि 139 विकेट्स घेतल्या. त्याने पाकिस्तानसाठी 91 टी-20 सामनेही खेळले आहेत.
हाफिजने टी-20 फॉरमॅटमध्ये 54 विकेट घेतल्या आणि 1992 धावा केल्या. हे आकडे सांगतात की मोहम्मद हाफीज कोणत्या स्तरावर आहे. मात्र त्यानंतरही तो सलग 3 सामन्यात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, परतल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
ल्यूक रोंची: न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ल्यूक रोंचीचे नावही या यादीत आहे. त्याच्या कारकिर्दीत रोंचीही सलग ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. कारकिर्दीतील शेवटच्या 3 सामन्यात त्याने शून्य धावा केल्या.
ल्यूक रोंचीने न्यूझीलंडकडून 4 कसोटी सामन्यात केवळ 88 धावा केल्या. तर 85 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 23.68 च्या सरासरीने केवळ 1397 धावा केल्या आहेत. तर रोंचीने 33 टी-20 सामन्यात 17.95 च्या सरासरीने 359 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 140.23 राहिला आहे.रोंचीने मात्र आता काही वर्षे जगभरातील T20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो पाकिस्तान सुपर लीग दरम्यान खेळताना दिसत आहे. जिथे त्याची कामगिरीही उत्कृष्ट आहे. जे तो एक चांगला खेळाडू असल्याचे सिद्ध करते.
मोईन अली (Moeen Ali): इंग्लंड संघाचा फिरकी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचे नावही या यादीत दिसत आहे. आजच्या काळात तो त्याच्या कारकिर्दीत खूप चांगला फलंदाज बनला आहे. पण 2015 मध्ये मोईन अली सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला. त्यापैकी दोन वेळा पाकिस्तान आणि तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता.
मोईन अलीने इंग्लंड संघासाठी 60 कसोटी सामन्यात 2782 धावा केल्या आणि 181 बळी घेतले. 101 एकदिवसीय सामन्यांमध्ये मोईनने 1783 धावा केल्या आणि 85 विकेट घेतल्या. T20 फॉरमॅटमध्ये त्याने 28 सामने खेळताना 16 विकेट घेतल्या आणि 284 धावा केल्या.
अलीने अलीकडच्या काळात आपल्या फलंदाजीत सुधारणा केली आहे. त्यामुळे तो टी-२० लीगमध्येही खेळताना दिसत आहे. त्याची आयपीएलमधील कामगिरीही वाखाणण्याजोगी आहे. मात्र, तो फिरकीपटू म्हणूनही खूप यशस्वी ठरला आहे. त्यामुळे तो अष्टपैलूच्या भूमिकेसाठी योग्य वाटतो.
वॉशिंग्टन सुंदर: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचेही नाव या यादीत दिसत आहे. जरी त्याची कारकीर्द सध्या खूपच लहान आहे. मात्र त्यानंतरही वॉशिंग्टन सुंदर सलग तीन शून्य धावांवर बाद झाला आहे.
वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघाकडून आतापर्यंत 1 वनडेत 1 बळी घेतला आहे. तर त्याने 22 टी-20 सामन्यात 27.74 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने आतापर्यंत केवळ 26 धावा केल्या आहेत. ज्यासाठी त्याने फक्त 16 चेंडू खेळले आहेत.
सुंदर सध्या भारतीय टी-२० मध्ये नियमितपणे दिसतो. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये क्वचितच स्थान मिळते. पण त्याला भारतीय संघाचे भवितव्यही सांगितले जात आहे. त्याला सध्या जडेजाचा पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. विराट कोहलीच्या अष्टपैलू खेळाडूसाठी तो पहिली पसंती राहिला आहे.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…