2023 च्या विश्वचषकात सर्व संघांनी आपापला पहिला सामना खेळला आहे. प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम घडलेला आहेच. एकीकडे काही फलंदाज खोऱ्याने धावा ओढत आहेत तर, दुसरीकडे काही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. गुरुवारपर्यंत झालेल्या सामन्यात एकूण दहा फलंदाजांना भोपळा फोडता आला नाही. हे 10 फलंदाज नक्की कोण आहेत जे विश्वचषकातील सुरवातीच्या सामन्यात शून्यावर बाद झाले. एक नजर टाकूया..
हे 10 फलंदाज विश्वचषकात शून्यावर बाद झाले.
विल यंग: विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज विल यंग हा इंग्लंड विरुद्ध खेळत असताना शून्यावर बाद झाला. या सामन्यात त्याला छाप सोडता आली नाही. तरी देखील या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर विजय मिळवला.
कुशल परेरा : श्रीलंकेचा फलंदाज कुशल परेरा हा पाकिस्तान विरुद्ध च्या महत्त्वाच्या सामन्यात केवळ हजेरी लावण्याचे काम केले. तो शून्यावर बाद झाला. सध्या तो खरा फॉर्मत आहे. या सामन्यात पाकिस्तानने धमाकेदार विजय मिळवला.
ॲलेक्स कॅरी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरी हा शून्यावर बाद झाला. मिचेल मार्श हा देखील जसप्रीत बुमराह च्या इन्स्विंग चेंडूवर शून्यावर बाद झाला. याच सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन, श्रेयश अय्यर हे तिन्ही भरवशाचे फलंदाज शून्य धावसंख्येवर बाद झाल्याने भारतीय संघाची अवस्था दयनीय झाली होती. लो स्कोरिंगच्या या सामन्यात अखेर भारताने विराट आणि राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवला.

लियाम लिविंगस्टोन : इंग्लिश फलंदाज लियाम लिविंगस्टोन याला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात एकही धावसंख्या जोडता आली नाही.
नजमूल हुसेन : बांगलादेशचा फलंदाज नजमूल हुसेन इंग्लंड विरुद्ध च्या सामन्यात एकही धाव काढू शकला नाही. इंग्लंडने दिलेल्या 365 धावांच्या आव्हानाखाली बांगलादेशचा संघ दडपून गेला.
पथुम निसंका: पथुम निसंका हा देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शून्यावर माघारी परतला. या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचे तोंड पहावे लागले.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..