ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
Chennai Super Kings All Captains: इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिल्या लढतीत गेल्या मोसमातील विजेते चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
संघाने महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे फ्रँचायझीचे कर्णधारपद सोपावले आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा चौथा कर्णधार असेल. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनीशिवाय सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनीही फ्रँचायझीची जबाबदारी सांभाळली आहे.
OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
धोनीने 235 सामन्यांमध्ये भूषवले चेन्नईचे कर्णधारपद!
चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 235 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने 142 सामने जिंकले असून 90 सामने गमावले आहेत. 1 सामना बरोबरीत तर 2 अनिर्णित राहिले. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 6 सामने खेळले आहेत आणि फक्त 2 जिंकले आहेत. रैनाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 3 सामने गमावले आणि 1 सामना बरोबरीत सुटला.
गेल्या हंगामात रवींद्र जादेजाकडे होते चेन्नईचे कर्णधारपद.
IPL 2022 पूर्वी रवींद्र जडेजाची चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 8 सामने खेळले आणि फक्त 2 जिंकले. संघाला 6 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. यानंतर धोनीला पुन्हा फ्रँचायझीचा कर्णधार बनवण्यात आले. अशा परिस्थितीत या वेळीही असे काही पाहायला मिळेल का? रुतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी चांगली नसेल, तर संघ नवीन कर्णधाराचा शोध घेऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्जचे आजवरचे कर्णधार ( Chennai Super Kings All Captains)
महेंद्रसिंग धोनी: 235 सामने
रवींद्र जडेजा : ८ सामने
सुरेश रैना : ६ सामने
ऋतुराज गायकवाड: YTP*
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
- IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…
- IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!