तब्बल 16 कोटी मोजून या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्सने केले आपल्या ताफ्यात दाखल, ड्वेन ब्रावोची रिप्लेसमेंट म्हणून खेळणार आयपीएल 2023!
आयपीएल 2023 चे मिनी ऑक्शन आज सुरु आहे. ज्यात अनेक दिग्गज खेळाडूंसह काही युवा खेळाडूंवर सुद्धा बोली लावण्यात येत आहे. प्रत्येक संघाने आपल्या पद्धतीने स्ट्रेटर्जी करून कोणते खेळाडू घ्यायचे हे ठरले आहे. आणि ते त्याच प्रकारे त्या खेळाडूला आपल्याकडे घेण्यासाठी बोली लावत आहेत.

चेन्नई सुपर किंग्स कडे पहायचं म्हटल तर त्यांना या लिलावातून तशी काही मोठी अपेक्षा नव्हती. म्हणजे जवळपास त्यांचा पूर्ण संघ हा लिलावाच्या आधीच परिपूर्ण खेळाडूंनी भरलेला दिसतोय.
मात्र तरीही या लिलावात त्यांनी काही खेळाडूंना टार्गेट करण्याचे आधीच ठरवले होते. स्वतः चेन्नईच्या मालकांनी याबद्दल खुलासा केला होता.
त्यावरच काम करत चेन्नईने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. त्याच्यासाठी चेन्नईने तब्बल 16..25 करोड रुपये देऊन खरेदी केली आहे. चेन्नईने ही खरेदी केलेली लिलावातील पहिलीच खरेदी आहे.
LSG out of the race and Ben Stokes is SOLD to CSK for INR 16.25#TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो या आयपीएल मध्ये खेळतांना दिसणार नाही. म्हणूनच त्याच्या जागी संघाने बेन स्टोकसला टार्गेट केले आहेत. ब्रावो प्रमाणेच स्टोक्स गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन करण्यास ओळखला जातो.
म्हणूनच चेन्नईने त्याला आपल्या संघात दाखल केले आहे. आता येणाऱ्या सामन्यात स्टोक्स चेन्नईच्या या आशेवर कसा खरा उतरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.