IPL UPDATE: मिनी लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंनंतर चेन्नईच्या संघ बनला सर्वांत घातक, या 4 खेळाडूंमुळे संघात आलय नवा जोश, अशी असू शकते चेन्नईची प्लेईंग 11,पहा यादी…
काल कोची येथे आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव पार पडला. पहिल्या दिवशी अनेक संघांनी आपल्या गरजेनुसार खेळाडूंना टार्गेट करत संघात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी बऱ्याच फेन्चायझीन त्यांना यश सुद्धा आले तर काही फेन्चायझीला पैश्याची कमतरता असल्यामुळे हवा तो खेळाडू न घेता त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडून समाधान मानावे लागले.
आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वांत जास्त यशस्वी टीम मानली जाणारी चेन्नई सुपर किंग्सच्या मालकांनी सुद्धा या लिलावात चांगले खेळाडू खरेदी केले. ड्वेन ब्रावोच्या निवृत्तीनंतर संघाला एक असा खेळाडू हवा होता जो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चांगले योगदान देऊन अष्टपैलू कामगिरी निभावू शकेल. शिवाय त्याच्याकडे फिनिशर म्हणून सुद्धा जबाबदारी देता यावी.
Signed ✍️and Stamped💮
📍Destination: 6️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣5️⃣ 🦁#WhistlePodu #SuperAuction 🦁💛 pic.twitter.com/0jlafz9v1n— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 23, 2022
म्हणूनच त्यांनी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला टार्गेट केले. स्टोक्सला संघात सामील करून घ्यायचेच असं ठरवलेल्या चेन्नईच्या मालकांनी त्याला शेवटी संघात सामी करून घेतलेच. यासाठी त्यांनी तब्बल 16.25 कोटी रुपये मोजले. त्याच्या येण्याने संघात नवी उर्जा आल्याचे स्वतः कोच यांनी म्हटल आहे.
2023 च्या लिलावात खरेदी केलेले खेळाडू: स्टोक्स जरी चेन्नईसाठी सर्वांत महागडा खेळाडू असला री चेन्नईने लिलावात आणखी काही खेळाडू खरेदी केलेत. त्यात अजिंक्य रहाणे (INR 50 लाख),, शेख रशीद (INR 20 लाख), निशांत सिंधू (INR 60 लाख), काइल जेमिसन (INR 1 कोटी), अजय मंडल (INR INR). 20 लाख), भगत वर्मा (INR 20 लाख).
Some 🔥🥳 to brighten up your morning! #SuperAuction #WhistlePodu 🦁💛pic.twitter.com/X1ij8AXsnd
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 24, 2022
त्याआधी चेन्नईने रिटेन केलेले खेळाडू सुद्धा चांगल्या लयीत दिसताहेत..
मिनी लिलावाच्या आधी चेन्नईने या खेळाडूंना केले होते रिटेन: एमएस धोनी (क), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, दीपेश पाथीराना, दीपराज सिंह. , प्रशांत सोळंकी , महेश थेक्षाना.
असा असेल चेन्नई सुपर किंग्सचा प्लेईंग 11 संघ:

एमएस धोनी (क), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी,महेश तीक्षणा
यातील काही खेळाडू जखमी झालेल्या खेळाडूंच्या बदल्यात संघात सामील करण्यात येतील. परंतु हाच संघ जवळपास आयपीएलमध्ये खेळताना आपल्याला दिसू शकतो.