CSK vs GT: शुक्रवारी येथे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग सामन्यात 35 धावांनी विजय नोंदवल्यानंतर, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, प्रत्येक षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा माझा प्रयत्न होता. गिल (104) आणि साई सुदर्शन (103) यांच्या शतकी खेळी आणि या दोघांमध्ये सलामीच्या विकेटसाठी 210 धावांची भक्कम भागीदारी यामुळे तीन विकेट्सवर 231 धावा करून गुजरातने सीएसकेचा डाव आठ विकेट्सवर 196 धावांवर रोखून शानदार विजय मिळवला.
सामना संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच गिल म्हणाला,
‘आमच्या मनात कोणतेही लक्ष्य नव्हते. आम्ही प्रत्येक षटकाचा आणि संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही कोणत्याही ध्येयाचा विचार करत नव्हतो. आमच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक षटकाचा आणि संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला.’ या दोघांची फलंदाजी पाहून गुजरात सामन्यात 300 च्या आसपास पोहोचेल असे वाटत होते, पण दोन्ही सलामीवर बाद झाल्यानंतर चेन्नईला दिलासा मिळाला.
साहजिकच लक्ष्य नसल्याच्या त्याच्या विधानावरून त्याला कोणत्याही किंमतीत मोठी धावसंख्या करायची होती हेच दिसून येते.
सुदर्शनला त्याच्या अप्रतिम भागीदारीबद्दल विचारले असता तो म्हणाला,
‘आमच्यामध्ये चांगली समज आहे. आम्ही एकमेकांना चांगले समजतो. पहिल्या विकेटसाठी ही निश्चितच आमची सर्वोत्तम भागीदारी आहे.’ मोहित शर्माने डेरिल मिशेल, मोईन अली आणि शिवम दुबे यांसारख्या धोकादायक फलंदाजांना बाद करून लक्ष्याचा बचाव करण्यास मदत केली.
पुढे बोलतांना गिल म्हणाला ‘मोहित भाई गेल्या काही वर्षांपासून आमच्यासाठी हे काम सातत्याने करत आहेत. आजही त्याने शानदार गोलंदाजी केली की त्याच्या संघाने शेवटी 15-20 धावा कमी केल्या. तो म्हणाला, ‘खर सांगू, एकेकाळी आम्ही 250 धावांच्या दिशेने वाटचाल करत होतो. पण आम्ही थोडे दूर राहिलो. शेवटच्या दोन-तीन षटकांत त्याने चांगली गोलंदाजी केली. मला वाटले की, आम्ही 10-15 धावांनी मागे आहोत, सामन्याच्या दृष्टीने नव्हे तर निव्वळ रनरेटच्या बाबतीत.
चेन्नईच्या पराभवामुळे वाढल्या अडचणी, प्लेऑफ साठी आता करावी लागणार आणखी मेहनत.
या मोठ्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली असून प्ले ऑफमध्ये खेळण्यासाठी या संघाला आता चांगली मेहनत घेऊन इतर संघाच्या कामगिरीवर देखील अवलंबून रहाव लागणर आहे. थोडक्यात चेन्नई आता अंतिम 4 मध्ये प्रवेश करू शकेल की नाही, हे इतर संघ कशी कामगिरी करते यावर सुद्धा डिपेंड करणार आहे. शिवाय राहिलेली सर्व सामने चेन्नईला जिंकावे लागणार आहेत. आणि त्यासाठी चांगली च मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे गुजरातने फक्त हा सामना जिंकून प्ले ऑफ खेळण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.