डॅरिल मिचेल: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ICC विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरचा मोठा विक्रम मोडला गेला आहे. आजच्या सामन्यापूर्वी जगातील सर्वात लांब षटकार ठोकण्याचा विक्रम भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरच्या नावावर होता. अय्यरने 106 मीटरमध्ये षटकार मारला होता. आता किवी फलंदाजाने हा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू डॅरिल मिशेलने श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला आहे.
डॅरिल मिचेल मोडला श्रेयस अय्यरचा विक्रम, ठोकला विश्वचषक मधील सर्वांत लांब षटकार..
डॅरिल मिचेलने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर इतका लांबलचक षटकार मारला की चेंडू स्टेडियमच्या वरच्या भागाला लागला आणि थेट रोडवर जाऊन पडला. हा षटकार पाहण्यासाठी खूपच प्रेक्षणीय होता. हा षटकार 107 मीटरचा होता. या षटकारासह जगातील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम डॅरिल मिशेलच्या नावावर झाला आहे. डॅरिल मिशेलने आज अप्रतिम खेळी केली.
IND vs NZ: भारताने किवींना ३९८ धावांचे लक्ष्य दिले.
भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 397 धावा केल्या. अशा स्थितीत किवी संघाला 398 धावा करायच्या आहेत. हे लक्ष्य इतके सोपे नाही, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारतासाठी शतकी खेळी खेळली.
याशिवाय शुभमन गिलनेही ८० धावांची नाबाद खेळी खेळली आहे. शेवटच्या क्षणी राहुलने 20 चेंडूत 39 धावांची खेळी केली. सर्व खेळाडूंच्या संमिश्र भागीदारीमुळे भारताने किवीजसमोर एवढे मोठे लक्ष्य ठेवले.
पहा व्हिडीओ,
View this post on Instagram
- हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..