David Warner Injury Update: डेव्हिड वार्नर तब्बल इतके दिवस संघातून बाहेर राहणार, प्रशिक्षक प्रवीण अमरेने केला मोठा खुलासा..!

0
1
David Warner Injury Update: डेव्हिड वार्नर तब्बल इतके दिवस संघातून बाहेर राहणार, प्रशिक्षक प्रवीण अमरेने केला मोठा खुलासा..!

David Warner Injury Update: आयपीएल 2024 सध्या सुरु आहे. आणि दिल्ली केपिटल संघ चांगली कामगिरी करत आहे. यादरम्यानच संघाच्या प्रशिक्षकाने दिल्ली कॅपिटल्स संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल मोठी माहिती शेअर केली आहे. दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी डेव्हिड वॉर्नर आणि इशांत शर्मा यांच्या फिटनेसबाबत अपडेट शेअर केले आहे. प्रवीण अमरे म्हणाले की,

David Warner Injury Update :डेव्हिड वॉर्नर आणि इशांत शर्मा यांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो.

Devid Warner Injury Update: डेव्हिड वार्नर तब्बल इतके दिवस संघातून बाहेर राहणार, प्रशिक्षक प्रवीण अमरेने केला मोठा खुलासा..!

 

12 एप्रिल रोजी लखनौविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर लॅप शॉट मारण्याच्या प्रयत्नात जखमी झाला होता. त्यानंतर तो गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. इशांत शर्मा पाठीच्या समस्येशी झुंजत आहे. अमरे म्हणाले की, मला वाटते की वॉर्नरला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी एक आठवडा लागेल.

इशांत शर्मालाही फिट होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. मला वाटते की जेव्हा दोन्ही खेळाडू तंदुरुस्त होतील तेव्हा ते निवडीसाठी तयार होतील.

दिल्लीचा पुढचा सामना 29 एप्रिलला KKR विरुद्ध आहे. यानंतर दिल्लीचा संघ ७ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना खेळणार आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉलाही संघ व्यवस्थापनाने बाहेर बसण्यास सांगितले होते.

David Warner Injury Update: डेव्हिड वार्नर तब्बल इतके दिवस संघातून बाहेर राहणार, प्रशिक्षक प्रवीण अमरेने केला मोठा खुलासा..!

प्रवीण अमरे म्हणाले की,

पृथ्वी जेव्हा मैदानात पोहोचला तेव्हा त्याला बरे वाटत नव्हते, म्हणून आम्ही ठरवले की, तो 100 टक्के फिट नसेल तर त्याच्या जागी अभिषेक पोरेलला संधी देऊ. मुंबईविरुद्धच्या सामन्यात जेक फ्रेझरने दिल्लीसाठी तुफानी फलंदाजी केली होती हे विशेष. त्याने अवघ्या 27 चेंडूत 84 धावा केल्या होत्या. त्यामुळे दिल्ली संघाने मुंबईसमोर 257 धावा केल्या.

फ्रेझरच्या खेळीचे कौतुक करताना अमरे म्हणाले की, तो दुबई कॅपिटल्ससाठी तीन सामने खेळला होता आणि आमचा संघ त्याला घेण्यासाठी खूप उत्सुक होता. संधी मिळाल्यावर आम्ही त्याची निवड केली. महत्त्वाची बाब म्हणजे फ्रेझर दिल्लीकडून पहिले पाच सामने खेळला नव्हता. मात्र गेल्या 5 सामन्यात त्याने 247 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. या काळात त्याचा स्ट्राइक रेट २३७ च्या वर राहिला आहे.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here