विश्वचषक : इंग्लंडचा मध्यम गती वेगवान गोलंदाज डेव्हिड विली याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 33 वर्षीय डेव्हिड विली हा विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्ती सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा बुधवारी केली. काही दिवसांपूर्वी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेटबोर्डाने कोणत्या खेळाडूंशी करार केला आहे, याची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये डेव्हिड विली याला स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर डेव्हिडने तडका फडकी सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात आहे. ( England all rounder David willey say goodbye to international cricket )
विश्वचषक सुरु असतांना डेव्हिड विलीने जाहीर केली निवृत्ती
Instagram पर यह पोस्ट देखें
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने मागील आठवड्यातून त्याला केंद्रीय करारामधून बाहेर काढले होते. डेव्हिड विलीने आपल्या निवृत्तीची घोषणा करत असताना instagram पेजवर लिहिले की,
“मला नाही वाटत की असेही दिवस यावे,मी लहानपणापासून इंग्लंड कडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. आता खरोखरच निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. इंग्लंड सारख्या देशाकडून मला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मला अभिमान आहे. मी खूप नशीबवान आहे की, मला सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली.”
“माझ्या पत्नीला, दोन मुलांसाठी, आई आणि वडिल यांचा त्याग आणि अतुलनीय पाठिंब्याशिवाय मी माझी स्वप्ने पूर्ण करू शकलो नसतो. विशेष आठवणी शेअर केल्याबद्दल आणि जेव्हा मी मानसिक दृष्ट्या खचलो होतो तेव्हा मला धीर दिल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमी सोबत असेन. तसेच कृतज्ञ असेल.”
डेव्हिड विलीची अंतरराष्ट्रीय कारकीर्द
डेव्हिड विली याने 2015 मध्ये आयर्लंड विरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत 70 एकदिवसीय सामन्यांमध्ये 94 बळी घेतली आहेत. तसे 43 T20 51 बळी घेतल्याची नोंद आहे. विली जगभरातील T20 क्रिकेट खेळत राहणार आहे. त्याने गेल्या वर्षी टी-20 ब्लास्टमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे कर्णधारपद भूषवले होते आणि द हंड्रेडमध्ये वेल्श फायरचेही प्रतिनिधित्व केले होते. तो जानेवारीमध्ये ILT20 मध्ये अबू धाबी नाइट रायडर्सकडून खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलपूर्वी त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातही कायम ठेवले जाऊ शकते.

विश्वचषक स्पर्धेत नुकत्याच भारताविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने 3 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद करत इंग्लंडला सामन्यात कमबॅक करून दिले होते. त्याच्या विकेटमध्ये विराट कोहली सूर्यकुमार यादव के एल राहुल या जागतिक दर्जाचा फलंदाजांचा समावेश होता. त्याने दहा षटकात 45 धावा देत 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते. शानदार गोलंदाजी करून ही इंग्लंडच्या संघाला भारताकडून 100 धावांनी पराभूत व्हावे लागले.
विश्वचषक 2023 बद्दल बोलायचे तर, इंग्लंड संघाला अजून तीन सामने खेळायचे आहेत. यात 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया, 8 नोव्हेंबरला नेदरलँड आणि 11 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध त्यांचे पुढील तीन सामने खेळायचे आहेत.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..