दिल्ली कॅपिटल्स: आयपीएल 2024च्या 17व्या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटलच्या संघाची सुरुवात ही फारच निराशा जनक राहिली आहे. पहिल्या चार पैकी एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. दिल्लीच्या पाचव्या सामन्यापूर्वी संघाला एक मोठा झटका बसला आहे. कुलदीप यादव याच्या कमरेला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मागील दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यांना तो मुकला. याच दरम्यान त्याच्याविषयी एक अपसेट करणारी बातमी समोर आली आहे.
कुलदीप यादव याला डॉक्टराणी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तो मैदानावर परत कधी परतणार याची अद्याप माहिती मिळाली नाही. त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्यामुळे तो संघासोबत प्रवास करतो आहे. सध्या कुलदीप यादव मुंबई मध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.
कुलदीपने या हंगामात दिल्ली कॅपिटल्स कडून सुरुवातीचे दोन सामने खेळले. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याने तीन विकेट घेतले. मात्र चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यांना तो मुकला. घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध धमाकेदार विजय मिळवता आला. मात्र केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्यांना 106 धावांनी पराभूत व्हावे लागले. या पराभूत झालेल्या सामन्यात दिल्लीच्या संघाला कुलदीप यादवची कमतरता जाणवली.
भारतीय क्रिकेट निवड समितीचे सदस्य कुलदीपच्या फिटनेसवर बारीक नजर ठेवून आहेत. कारण एक जून पासून वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी तो संघातला महत्त्वाचा भाग असणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर तो आयपीएलमध्ये देखील जबरदस्त फॉर्म दिसून आला. संपूर्ण कसोटी मालिकेत त्याने 19 विकेट घेतले.
धर्मशाळा येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याने पाच विकेट घेत सामनावीरचा किताब जिंकला होता. रविवारी होणाऱ्या सामन्यानंतर दिल्लीचा पुढचा सामना लखनऊ विरुद्ध 12 एप्रिल रोजी होणार आहे आशा आहे की, कुलदीप यादव या सामन्यापूर्वी फिट होईल आणि संघात सहभागी होईल.
IPL 2024 साठी दिल्लीचा संघ..
दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, स्वस्तिक चिकारा, यश धुल, अक्षर पटेल, मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, प्रवीण दुबे, जॅक फ्रेझर गुर्क, ललित यादव, समृद्ध नोर्किया, इशांत शर्मा, झाय रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, रसिक दार, विकी ओस्तवाल, मिचेल मार्श, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स.
हेही वाचा: