DC vs GT: 14 चेंडूमध्ये 7 षटकार, ऋषभ पंतने रचला इतिहास…आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक…!

DC vs GT: 14 चेंडूमध्ये 7 षटकार, ऋषभ पंतने रचला इतिहास...आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक...!

DC vs GT:  IPL 2024 च्या 40 व्या सामन्यात ऋषभ पंतने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरुद्ध तुफानी खेळी केली.त्याने केवळ 43 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. पंतने 8 षटकार मारले, त्याने 5 चौकारही मारले आणि यावेळी दिल्लीच्या कर्णधाराचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त होता. पंतची फटकेबाजी एवढी जबरदस्त होती की, एकेकाळी दिल्लीला २०० धावांपर्यंत मजल मारणे कठीण वाटत होते, पण तरीही त्यांनी २२४ धावांपर्यंत मजल मारली.

 

Rishabh Pant Viral Six Video: रिषभ पंतने मारला एवढा जबरदस्त षटकार की थेट कॅमेरामन झाला जखमी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...!
दिल्लीकडून फलंदाजी करण्यासाठी सहाव्या षटकात ऋषभ पंतने क्रीजमध्ये प्रवेश केला. त्यावेळी संघाने 44 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या आणि पंतसमोर डाव वेगाने पुढे नेण्याचे आव्हान होते. अक्षर पटेलसह पंतने हे काम चोख बजावले. दोघांनी अवघ्या 33 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी 68 चेंडूत 113 धावा जोडल्या. अक्षर पटेलने शानदार अर्धशतक झळकावले पण यानंतर पंतने कहर केला. या खेळाडूने 34 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर दिल्लीच्या कर्णधाराने कहर केला. पंतने 20 व्या षटकात मोहित शर्माला चांगलाच फटकारला. मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात या खेळाडूने 4 षटकार ठोकले. पंतने शेवटच्या 6 चेंडूत 31 धावा केल्या.

T20 World Cup 2024 Team India playing 11: हार्दिक पंड्या नाही तर हा खेळाडू होणार भारतीय संघात सामील, वीरेंद्र सेहवागने केली मोठी भविष्यवाणी..!

DC vs GT:  मोहित शर्माला पंत ने ठोकल्या धावा..

ऋषभ पंतने गुजरातच्या सर्व गोलंदाजांवर सिंगल-डबल घेण्याची रणनीती अवलंबली परंतु वेगवान गोलंदाज मोहित शर्माविरुद्ध तो अतिशय आक्रमक दिसला. पंतने मोहित शर्माच्या  14 चेंडूत 7 षटकार ठोकले. पंतने मोहितचा संथ चेंडू, वेगवान चेंडू किंवा बाऊन्सरला सोडले नाही. पंतच्या या तुफानी फटकेबाजीने एक मोठा विक्रमही रचला गेला.

DC vs GT: 14 चेंडूमध्ये 7 षटकार, ऋषभ पंतने रचला इतिहास...आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक...!

पंतच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने गुजरातविरुद्ध शेवटच्या पाच षटकांत ९७ धावा केल्या. गेल्या 7 मोसमातील शेवटच्या पाच षटकांतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये शेवटच्या पाच षटकांमध्ये सर्वाधिक ११२ धावा करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर आहे. पंतने आपल्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर हे स्पष्ट केले आहे की, 15 महिने क्रिकेटपासून दूर असलो तरी त्याच्यात तीच आग कायम आहे. आता पंतची आयपीएलनंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड होणार हे निश्चित आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *