DC vs RR: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 56 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेकसाठी मैदानात येताच इतिहास रचला. आयपीएलमधील सर्वाधिक सामन्यांमध्ये आरआरचे नेतृत्व करणारा तो कर्णधार बनला आहे. त्याने शेन वॉर्नला मागे टाकले आहे.
DC vs RR: वॉर्नने 55 सामन्यांमध्ये भूषवले होते कर्णधारपद!
Warnie would be proud, Sanju! 💗 pic.twitter.com/QHjX1H6AIx
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2024
शेन वॉर्नने 55 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. आता संजू 56 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा कर्णधार बनला आहे. याशिवाय राहुल द्रविडने 34 सामन्यात राजस्थान रॉयल्सचे, स्टीव्ह स्मिथने 27 सामन्यात, अजिंक्य रहाणेने 24 सामन्यात आणि शेन वॉटसनने 21 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे.
IPL2024: राजस्थान प्लेऑफपासून 1 विजय दूर
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आजपर्यंत संघाने 10 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. संघ 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर संघाने आजचा सामना जिंकला तर प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित होईल.
कर्णधारपदाखाली संजूची कामगिरी
संजूच्या नेतृत्वाखाली आरआरने आजपर्यंत ५५ सामने खेळले आहेत. या कालावधीत राजस्थान रॉयल्सने 30 जिंकले आहेत आणि 25 गमावले आहेत. संजू 2021 पासून राजस्थानचे नेतृत्व करत आहे, तर शेन वॉर्नने 2008 ते 2011 पर्यंत संघाचे नेतृत्व केले आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली, RR ने 2008 (पहिल्या मोसमात) IPL चे विजेतेपद पटकावले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता