DC vs SRH: सामना गमवला असला तरीही दिल्लीचा युवा फलंदाज ‘जॅक फ्रेझर मॅकगर्क’ने रचला इतिहास.. ठोकले आयपीएल 2024 मधील सर्वांत जलद अर्धशतक..!

0
2
DC vs SRH: सामना गमवला असला तरीही दिल्लीचा युवा फलंदाज 'जॅक फ्रेझर मॅकगर्क'ने रचला इतिहास, ठोकले आयपीएल 2024 मधील सर्वांत जलद अर्धशतक..!

DC vs SRH: दिल्ली कॅपिटल्सचा शक्तिशाली फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्कने (Jake Fraser Mcgurk) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दमदार कामगिरी केली. विरोधी संघाच्या गोलंदाजांवर निशाणा साधत त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. या आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यासह त्याने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडला मागे सोडले. या दोघांनी प्रत्येकी 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

 

DC vs SRH: सामना गमवला असला तरीही दिल्लीचा युवा फलंदाज 'जॅक फ्रेझर मॅकगर्क'ने रचला इतिहास, ठोकले आयपीएल 2024 मधील सर्वांत जलद अर्धशतक..!

आयपीएल 2024 चा 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद ( DC vs SRH)यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सनराजर्स हैदराबादने 20 षटकात 7 गडी गमावून 266 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि शाहबाज अहमद यांनी अर्धशतके झळकावली. लक्ष्याचा पाठलाग करताना जेक फ्रेझर-मॅकगर्कने दिल्लीसाठी स्फोटक कामगिरी केली. त्याने दमदार अर्धशतक ठोकले.

DC vs SRH:  जॅक फ्रेझर मॅकगर्कने (Jake Fraser Mcgurk) या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले.

मॅकगर्कने IPL 2024 मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. यासाठी त्याने केवळ 15 चेंडू घेतले. या बाबतीत अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांनी 16 चेंडूंची मदत घेतली. या सामन्यात 22 वर्षीय फलंदाजाने 18 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने ३६१.११ च्या स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि सात षटकार मारले.

IPL 2024 मधील सर्वात जलद अर्धशतक (चेंडूंच्या आधारे) (Fastest half century in ipl 2024)

 

 

  • 1 जेक फ्रेझर-मॅकगर्क 15 चेंडू सनरायझर्स हैदराबाद दिल्ली
  • 2 अभिषेक शर्मा 16चेंडू मुंबई इंडियन्स हैदराबाद
  • 3 ट्रॅव्हिस हेड 16 चेंडू  दिल्ली कॅपिटल्स दिल्ली

मॅकगर्कचे आयपीएल पदार्पण 17 व्या हंगामात झाले. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 55 धावांची इनिंग खेळली होती. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक आहे. यासह तो दिल्लीसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याने या प्रकरणात ख्रिस मॉरिस आणि ऋषभ पंतसारख्या फलंदाजांना मागे सोडले.

DC vs SRH: सामना गमवला असला तरीही दिल्लीचा युवा फलंदाज 'जॅक फ्रेझर मॅकगर्क'ने रचला इतिहास, ठोकले आयपीएल 2024 मधील सर्वांत जलद अर्धशतक..!

दिल्ली कॅपिटल्स साठी सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकणारे खेळाडू..!

जेक फ्रेझर-मॅकगर्क 15* सनराजर्स हैदराबाद 2024

ख्रिस मॉरिस 17* गुजरात लायन्स 2016

ऋषभ पंत 18* मुंबई इंडियन्स 2019

पृथ्वी शॉ 18* कोलकाता नाइट रायडर्स 2021

ट्रिस्टन स्टब्स 19* मुंबई इंडियन्स 2024


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here