ड्रीम डेब्यू: धडाकेबाज खेळी करत आयपीएल पदार्पण गाजवणारे 5 जिगरबाज खेळाडू!

0
7
आयपीएल
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 चे बिगुल लवकरच वाजणार आहे. प्रत्येक क्रीडाप्रेमी 22 मार्चची आतुरतेने वाट पाहत आहे. जगभरातले क्रिकेटपटू भारतात दाखल झाले असून ते आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जे खेळाडू पहिल्यांदाच पदार्पण करणार आहेत, त्यांच्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कारण आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी पदार्पणाच्या सामन्यातच धमाकेदार खेळी करत भीम पराक्रम केला आहे. आज आपण अशा पाच खेळाडूंची माहिती पाहणार आहोत, ज्यांनी पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात लक्षवेधी खेळी केली होती.

आयपीएलमध्ये या खेळाडूंनी पदार्पणातच घातला होता धुमाकुळ..

1.Brendon McCullum

ड्रीम डेब्यू: धडाकेबाज खेळी करत आयपीएल पदार्पण गाजवणारे हे आहेत पाच जिगरबाज खेळाडू!

आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. बंगळूर आणि कोलकत्ता संघामध्ये सलामीचा पहिला सामना झाला होता. या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅडन मॅक्युलम याने वादळी खेळी केली होती. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांची अक्षरशा त्रिधातिपट उडाली होती. अवघ्या 73 चेंडू त्याने 158 धावांची अविस्मरणीय स्फोट खेळी केली होती. यामध्ये त्याने दहा चौकार आणि तब्बल 13 उत्तुंग षटकार ठोकले होते. या खेळीला 16 वर्ष झाले असले तरी ब्रॅडन मॅक्युलम नावाचे वादळ आजही बेंगलोरच्या कानात गोंगावत आहे.

2.Michael Hussey

‘मिस्टर क्रिकेट’ या नावाने फेमस असलेला ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज माईक हसी हा आयपीएल मधील सर्वोत्तम फलंदाज मानला गेला होता. माइक हसी हा सध्या चेन्नई सुपर किंग्स सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय. खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने पहिल्या सामन्यात धमाका केला होता. हसीने किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळताना 54 चेंडूत 116 धावांची वादळी शतकी खेळी केली होती. यात आठ चौकार आणि नऊ गगनचुंबी खणखणीत षटकार ठोकले होते.

3.Shaun Marsh

आयपीएल 2008च्या मौसमातील पहिला हिरो म्हणून शॉन मार्श ओळखला जातो. वास्तविक पाहता शॉन मार्चला पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र चौथ्या सामन्यात डेक्कन चार्जेस विरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 62 चेंडूत 84 झटपट खेळी केली होती. यामध्ये 11 चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. या खेळीनंतर त्याला प्रत्येक सामन्यात खेळवण्यात आले. तसेच तो या सीझनचा ऑरेंज कॅप चा मानकरी देखील झाला.

आयपीएल

4.Gream Smith

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ याने आयपीएलची सुरुवात राजस्थान रॉयल संघाकडून खेळताना केली. ग्रीम स्मिथने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत सर्वांना चकित करून टाकले. त्याने अवघ्या 45 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 71 धावा काढल्या. मात्र स्मिथची कारकीर्द जास्त लांबली नाही.

5.james Hopes

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू जेम्स होप्स याने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात ड्रीम डेब्यू करत धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली होती. त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना चांगले झोडपून काढले. अवघ्या 33 चेंडूत 71 धावांची खेळी केले होते, ज्यामध्ये दहा चौकराने तीन षटकारांचा समावेश होता. त्यावेळी तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत होता. जेम्स ऑफ सध्या आयपीएलच्या सपोर्ट मध्ये काम करतोय.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.