इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील 25 व्या सामन्यात लंकेने बाजी मारली आहे. श्रीलंकेने इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एक उलटफेअर केला आहे. या पराभवामुळे इंग्लंडच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या अशा संपुष्टात आल्याआहेत. तर श्रीलंकेने या विजयासह सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठीच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत.
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय फेल गेला. लंकेच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केल्यामुळे इंग्लंडचे पहिले 5 फलंदाज 85 धावात माघारी परतले होते. सामन्यांमध्ये लंकेच्या गोलंदाजापुढे त्यांच्या फलंदाजाची बोलती बंद झाली. इंग्लंडचा संघ संपूर्ण पन्नास षटके देखील खेळू शकला नाही. 33.3 चेंडूत इंग्लंडचा संघ 156 धावांवर सर्व बाद झाला.
बेन स्टोक्सने केवळ सर्वाधिक 43 धावा काढला. त्याला लाहिरु कुमारा याने बाद केले. सलामीचा फलंदाज जॉनी बेयरस्ट्रो याने 30 धावांची खेळी केली त्याला रजिताने बाद केले. इंग्लंडचे सहा फलंदाज 10 चा आकडा देखील पार करू शकले नाहीत.
बंगळूरची खेळपट्टी हि श्रीलंकाच्या गोलंदाजांसाठी अनुकूल ठरली. या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना खुलेआमपणे फटके मारू देण्याची संधी दिली नाही. श्रीलंकेकडून लाहिरु कुमार याने सर्वाधिक तीन विकेट बाद केले. गेल्या अनेक वर्षापासून सांगा बाहेर राहिलेला अंजलो मॅथूज याने दमदार कम्बॅक करत दोन विकेट घेतले. रजिता देखील दोन विकेट घेण्यात यशस्वी ठरला
इंग्लंडने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली नऊ धावांवर असताना डेव्हिड विलेने कुसल परेरा याला बाद करत इंग्लंडला पहिले यश. तर 23 धावांवर असताना श्रीलंकेला दुसरा झटका लागला कुशल मेंडीज हा 11 धावांवर डेव्हिड विलीचा शिकार बनला.
पहिले दोन विकेट लवकर गमावल्यानंतर श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज पथूम निसंका आणि सदिरा समर विक्रमा यांनी श्रीलंकेचा डाव सांभाळला दोघांमध्ये 137 धावांची नाबाद भागीदारी झाली. मी संकयाने नाबाद 77 तर सदिरायाने नाबाद 65 धावांची खेळी केली. त्यांच्या या दोघांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर श्रीलंकेने 25.4 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात हा विजय मिळवला. श्रीलंकेचे या विजयासह चारगुण झाले आहेत. त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखीन दोन विजयाची गरज आहे. इंग्लंडचा पुढचा सामना रविवारी 29 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना इंग्लंडने गमावला तर ते सेमी फायनल च्या रेस मधून बाहेर पडतील.