हिम्मत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघाने शुक्रवारी (२० जानेवारी) मोठा फेरबदल करत मुंबई संघाला पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुख्य बाब म्हणजे गेल्या ४२ वर्षानंतर पहिल्यांदाच दिल्ली संघाने मुंबई संघाला पराभूत केले आहे. तर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा दिल्ली संघाने मुंबई संघावर विजय मिळवला आहे. दिविज मेहराने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाला केवळ ९५ धावांचे आव्हान देण्यात यश आले होते. हे आव्हान दिल्ली संघाने केवळ २ फलंदाज गमावत पूर्ण केले.
यापूर्वी झालेल्या ५ सामन्यांमध्ये दिल्ली संघाला २sarfaraz mi सामने गमवावे लागले होते. तर ३ सामने अनिर्णीत राहिले होते. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सरफराज खानच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबई संघाला २९३ धावा करण्यात यश आले होते. सरफराज खानला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला ४० धावांचा आकडा देखील पार करता आला नाही. सरफराज खानने १६ चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने १२५ धावांची खेळी केली. तर दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना विजयराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले.
दिल्ली संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३६९ धावा करत ७६ धावांची आघाडी घेतली होती. दिल्ली संघाकडून वैभव रावल आणि हिम्मत सिंगने ५ व्या विकेटसाठी १९५ धावा जोडल्या. तर मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडेने सर्वाधिक ४ गडी बाद केले.
तर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात शतक झळकावणारा सरफराज खान दुसऱ्या डावात गोल्डन डक वर माघारी परतला. मुंबईचा दुसरा डाव १७९ धावांवर संपुष्टात आला.
हे ही वाचा.
भारतीय संघाने ‘ही’ चूक सुधारली नाही तर वर्ल्ड कप गेलाच समजा! वाचा काय म्हणाले गावस्कर..