Delhi Capital New Captain: आयपीएल सुरु होण्याच्या 2 दिवस आधी दिल्लीने केली नव्या कर्णधाराची घोषणा, ‘हा’ स्टार खेळाडू सांभाळणार संघाची कमान..

 Delhi Capital New Captain: आयपीएल सुरु होण्याच्या 2 दिवस आधी दिल्लीने केली नव्या कर्णधाराची घोषणा, 'हा' स्टार खेळाडू सांभाळणार संघाची कमान..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

 Delhi Capital New Captain: आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार बदलला आहे. एकीकडे दिल्लीच्या करोडो चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे नव्या कर्णधाराचे नाव समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आयपीएल सुरू होण्यास अवघे ३ दिवस उरले आहेत. त्याआधी आज म्हणजेच 20 मार्च रोजी संघाने नवीन कर्णधाराची निवड केली आहे.

आयपीएल 2023 च्या आधी दिल्लीचा पूर्णवेळ कर्णधार ऋषभ पंतचा अपघात झाला होता. या कारणामुळे पंत आयपीएल 2023 खेळू शकला नव्हता.. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद देण्यात आले. मात्र आता दिल्लीने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे.

 Delhi Capital New Captain:  DC च्या करोडो चाहत्यांसाठी मोठी बातमी, रिषभ पंत कर्णधारपदी विराजमान..

दिल्ली कॅपिटल्सने आपला नवा कर्णधारम्हणून टीम इंडियाचा युवा खेळाड रिषभ पंतची निवड केली आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर होता, मात्र पंतच्या पुनरागमनामुळे ही जबाबदारी वॉर्नरकडून परत घेण्यात आली असून ही जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे.

पंतला कर्णधार बनवण्याची अटकळ आधीच बांधली जात होती, पण काल ​​बातमी आली की ,दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग कदाचित ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवणार नसून ते दुसऱ्याकडे सोपवणार आहेत. पण आता फ्रँचायझीनेच जाहीर केले आहे की, ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्लीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे पंतच्या लाखो चाहत्यांना दिलासा मिळाला असता. तो पुन्हा एकदा पंतला कर्णधार म्हणून पाहायला मिळणार आहे.

 Delhi Capital New Captain: आयपीएल सुरु होण्याच्या 2 दिवस आधी दिल्लीने केली नव्या कर्णधाराची घोषणा, 'हा' स्टार खेळाडू सांभाळणार संघाची कमान..

डिसेंबर 2022 मध्ये झाला होता रिषभ पंतचा अपघात!

भारताचा स्फोटक फलंदाज रिषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला होता. हे खेळाडू त्यांच्या कारमधून उत्तराखंडमधील त्यांच्या घरी जात होते. यावेळी त्यांची कार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. यावेळी मोठ्या कष्टाने खेळाडूचा जीव वाचला. त्या परिस्थितीतून पंतला क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे खूप कठीण वाटत होते, पण अखेर 23 महिन्यांनंतर तो पुनरागमन करण्यात यशस्वी झाला आहे. (Rishabh Pant Appointed as a captain of Delhi Capital for IPL 2024)


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *