सामना दिल्ली ने जिंकला पण हृदय माही भाई ने जिंकले,धोनीची नव्या विक्रमाला गवसणी…!

सामना दिल्ली ने जिंकला पण हृदय माही भाई ने जिंकले,धोनीची नव्या विक्रमाला गवसणी...!

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने 16 चेंडू 37 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीमध्ये त्याने चार चौकार आणि तीन षटकार ठोकत महत्त्वपूर्ण खेळी केली. महेंद्रसिंग धोनीची ही छोटीशी खेळी सीएसकेला विजय मिळवून देऊ शकली नाही, मात्र त्याच्या या खेळीने संपूर्ण क्रिकेट प्रेमी आनंदात न्हावून निघाले. भलेही सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला असेल पण हृदय मात्र महेंद्रसिंग धोनीने जिंकले. या खेळीसह महेंद्रसिंग धोनीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. यष्टीरक्षक म्हणून खेळताना टी 20 क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक धावा काढल्या आहेत. या विक्रमासह पाकिस्तानचा दिग्गज खेळाडूमोहम्मद रिजवान याला पाठीमागे टाकले.

यष्टिरक्षक म्हणून खेळताना महेंद्रसिंग धोनीच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 7,036 धावांची नोंद आहे तर मोहम्मद रिजवानच्या नावावर टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये 6,962 धावा आहेत. दिल्ली विरुद्धच्या सामन्यांमध्ये धोनीने रिजवानला पाठीमागे टाकले. t20 क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळताना सर्वाधिक धावा क्विंटन डि कॉकच्या नावे आहेत, क्विंटन डि कॉक ने टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये 8578 धावा केले आहेत तर दुसऱ्या स्थानावर जोश बटलर आहे बटलर ने t-20 क्रिकेटमध्ये 7721 धावा केल्या आहेत.

 

टी20 सर्वाधिक धावा काढणारे यष्टीरक्षक

  • 8578 – क्विंटन डी कॉक

  • 7721 – जोस बटलर

  • 7036 – एमएस धोनी*

  • 6962 – मोहम्मद रिज़वान

  • 6454 – कामरान अकमल

यासह धोनीने यष्टिरक्षक म्हणून खेळताना 300 बळी घेण्याचा विक्रम देखील केला आहे. धोनीने सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ चा झेल पकडून हा विक्रम स्वतःच्या नावे केला.

सामना दिल्ली ने जिंकला पण हृदय माही भाई ने जिंकले,धोनीची नव्या विक्रमाला गवसणी...!

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे यष्टीरक्षक फलंदाज

1) एमएस धोनी – 300

2) दिनेश कार्तिक- 274

3) कामरान अकमल- 274

4) क्विंटन डी कॉक- 270

5) जोस बटलर – 209

धोनीचे सध्याचे वय 42 वर्ष सुरू आहे. मात्र त्याची फलंदाजी पाहून तो अद्यापही फिट वाटतोय. आयपीएल 2024च्या हंगामाच्या सुरुवातीलाच त्याने सीएसके चे नेतृत्व पद सोडून दिले होते. यंदाच्या हंगामामध्ये धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड हा संघाच्या नेतृत्व धुरा सांभाळत आहे. आयपीएल 2024 मध्ये सीएसके यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यात दोन विजय मिळवले तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल गुणतालिकेमध्ये सीएसके सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *