AUS vs PAK: . विश्वचषक 2023 चा 18 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान ( AUS vs PAK) यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामी जोडीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्फोटक सुरुवात केली. या सामन्यादरम्यान अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर खूपच आक्रमक दिसत आहे. त्याच्या या उत्कृष्ट खेळीदरम्यान त्याने एक विशेष कामगिरीही केली आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
AUS vs PAK: डेव्हिड वार्नरने मोडला अॅडम गिलख्रिस्टचा विक्रम.
36 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने एका खास बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टला मागे टाकले आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत, गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक स्पर्धेत भाग घेत असताना 1085 धावा काढल्या. तर वॉर्नरच्या नावावर आता 1100 हून अधिक धावा आहेत. माजी कर्णधार रिकी पाँटिंग अजूनही पहिल्या स्थानावर आहे. पाँटिंगने विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघासाठी सर्वाधिक 1743 धावा केल्या आहेत.
AUS vs PAK: विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज:
David Warner and Mitchell Marsh together scored 284 off 132 balls 👏🏻
Rest of the Australian batter scored 58 off 67 balls 😕#AUSvPAK #AUSvsPAK #CWC23 pic.twitter.com/60m04VgjJ5
— Sportsermon (@SportSermon) October 20, 2023
-
रिकी पाँटिंग – १७४३ धावा
-
डेव्हिड वॉर्नर – 1100* धावा
-
अॅडम गिलख्रिस्ट – १०८५ धावा
-
मार्क वॉ – 1004 धावा
-
मॅथ्यू हेडन – ९८७ धावा
AUS vs PAK: चिन्नास्वामीवर दिसला वॉर्नर-मार्श शो.
डेव्हिड वॉर्नर एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चांगली फलंदाजी करत होता. पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत वार्नरने शानदार 163 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीमध्ये त्याने तब्बल 14 चौकार आणि 9 षटकार ठोकले. वार्नरनंतर मिचेल मार्शनेही शतक झळकावून पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रोलीयाने प्रथम फलंदाजी करत 397 धावा काढल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकायचा असेल तर डोंगराएवढे लक्ष पुन्हा पार करावे लागणार आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी