शानदार..! पहिलाच विश्वचषक खेळणारा न्यूझीलंडचा सलामीवीर ‘डेवोन कॉनवे’ने इंग्लंडच्या गोलंदाजांची केली धुलाई, केवळ एवढ्या चेंडूत ठोकले शानदार शतक..
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या वनडे विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात सलामीवीर डेव्हन कॉनवेने मोठी कामगिरी केली आहे. संघासाठी सलामीला आलेला कॉनवे २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अवघ्या 83 चेंडूत त्याने ही कामगिरी केली. कॉनवेचा हा विश्वचषकातील पदार्पण सामना होता आणि त्यात शतक झळकावणारा तो न्यूझीलंडचा चौथा खेळाडू ठरला.
न्यूझीलंड संघासाठी २८३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या कॉनवेने पहिल्याच षटकापासून आक्रमक सुरुवात केली. जोडीदार विल यंगला लवकर गमावल्यानंतरही तो थांबला नाही आणि रचिन रवींद्रसोबत शानदार भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. कॉनवेने आतापर्यंत 14 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाला ते पराभूत करत आहेत.
Devon Conway lights up the #CWC23 with a lively hundred in the #ENGvNZ opener 🤩@mastercard milestones moments🏏#ENGvNZ #CWC23 pic.twitter.com/lC8quUP9gZ
— Umar Chaudhary (@umr_co) October 5, 2023
रचिन रवींद्रसोबत ऐतिहासिक भागीदारी
डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी आतापर्यंत 200 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील न्यूझीलंडसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोघांच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची अवस्था बिकट झाली आहे. रचिन रवींद्रनेही आपले शतक पूर्ण केले आहे. तो केन विल्यमसनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
दोघांनीही शतक झळकावलल्यामुळे न्यूझीलंडचा संघ चांगल्या स्थितीत आला असून त्यांना जीन्ण्यासाठी केवळ ५० धावांची आवश्यकता आहे. आणि ही जोडी ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहून हा सामना हे दोघेच जिंकून देतील असच दिसतंय.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..