प्रामुख्याने आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे हे आपल्याला माहीतच आहे.

आजपर्यंत क्रिकेट च्या इतिहासात अनेक खेळाडूंनी वेगवेगळी रेकॉर्ड बनवून क्रिकेट इतिहासात आपले नाव आणि रेकॉर्ड कोरून ठेवली आहेत. आजपर्यंत अशी काही रेकॉर्ड बनवली आहेत जी तोडणे अशक्य आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला धोनी आणि संगकाराला मागे टाकत मुशफिकुर रहीमने कोणता रेकॉर्ड बनवला आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आशिया चषकाचा पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये झाला. बांगलादेशने या सामन्यात 137 धावांनी मोठा विजय मिळवला होता. तर बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने शतक झळकावताना अनेक विकेट घेतल्या. आणि धोनी आणि संगकाराला मागे टाकत मुशफिकुर रहीमने नवीन विक्रम आपल्या नावी केला.
या आशिया सामन्यात मुशफिकर रहीमने 150 चेंडूत 144 धावा अशी आक्रमक फलंदाजी केली यामध्ये 11 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना 261 धावा करता आल्या होत्या.
एकवेळ संघाने 1 धावात 2 विकेट्स आणि 142 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. रहीमने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली आहे. याआधी एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा होती, जी भारताविरुद्ध बनवली होती.
महेंद्रसिंग धोनी आणि कुमार संगकारा या दोन्ही दिग्गज खेळाडूंना मागे टाकत मुशफिकुर रहीमच्या हा जबरदस्त विक्रम नोंदवला आहे. आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा रहिम हा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे.
याच्या आधी हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता. 2008 साली कुमार संगकाराने बांगलादेशविरुद्ध 121 धावांचा डाव खेळला होता. तसेच धोनी दुय्यम दुसऱ्या क्रमांकावर होता, तसेच महेंद्र सिंग धोनी ने १०९ धावांची खेळी केली आहे. परंतु हे रेकॉर्ड मुशफिकुर रहीमने ब्रेक केले आहेत.