आयपीएल २०२३ हा धोनी साठी चा असणार का शेवटचा हंगाम? हर्षा भोगले च्या ट्विट वरून समजेल उत्तर
इंडियन प्रीमियर लीग ला जगात सर्वात जास्त मोठी टी20 म्हणून ओळखले जाते आणि खरच ओळखले च पाहिजे. कारण प्रत्येक हंगामात आपणास नवीन खेळाडू नवीन संघ पाहायला भेटतात. तसेच अगदी सामने घासून होतात आणि अगदी फायनल मॅच ला तर लास्ट च्या ओव्हर मध्ये सामना घासून होतो. जो की असाच सामना आपणास बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल चा पाहायला भेटला.

चेन्नई सुपर किंग्ज चे कर्णधार महेंद्रसिंह धोनी ने १७ बॉल्स मध्ये ३२ रन्स नाबाद राहून केल्या. मात्र चेन्नई सुपर किंग्ज ला तीन रन्स करायच्या होत्या पण त्यांच्याकडून न झाल्याने चेन्नई ला पराभव सहन करावा लागला. मात्र आता असा प्रश्न पडला आहे की महेंद्रसिंह धोनी ची ही शेवटची आयपीएल आहे की नाही? हा प्रश्न महेंद्रसिंह धोनी च्या चाहत्यांच्या मनात तयार झालेला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल च्या अगदी मिडल मॅच दरम्यान हर्षा भोगले ने जे ट्विट केले आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल.
हर्षा भोगले ने ट्विट करत सांगितले की दरवर्षी आम्ही विचारत असतो की हा सिजन महेंद्रसिंग धोनी चा लास्ट सिजन आहे का? मात्र आजिबात नाही कारण महेंद्रसिंग धोनी अगदी व्यवस्थित प्रकारे बॉल मारतात आणि अशी धमाकेदार बॅटिंग करतात की असे वाटत नाही हा त्यांचा शेवटचा सिजन आहे.
हर्षा भोगले सांगतात की मागील काही वर्षात धोनी खेळत होता त्याप्रकारे जर आताच खेळ ते खेळत आहेत त्याहून कधीही ते चांगला खेळ खेळत आहेत. मागील वर्षाच्या आयपीएल तुलनेत महेंद्रसिंग धोनी या आयपीएल मध्ये आपली बॅटिंग चांगली करत आहेत तर ते हिट सुद्धा करत आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल या संघाची मॅच चेन्नई मधील एमए चिदंबरम स्टेडियम मध्ये खेळली गेली. जे की या मॅच दरम्यान राजस्थान रॉयल ने पहिल्या इनिग मध्ये बॅटिंग करत १७५ रन्स केल्या तर त्यांना चेस करत चेन्नई सुपर किंग्ज ने २० ओव्हरमध्ये फक्त १७२ रन्स झाल्या. चेन्नई सुपर किंग्ज ला हे टार्गेट पूर्ण करता आले नाही.
शेवटच्या ओव्हर मध्ये चेन्नई सुपर किंग्ज ला ६ रन्स ची गरज होती आणि धोनी च्या चाहत्यांना असे वाटत होते की धोनी ने सिक्स मारत ही मॅच काढावी मात्र असे काही घडले नसल्याने चेन्नई सुपर किंग्ज च्या पदरात हार अर्पण झाली.