टायगर अभी जिंदा है! 42 वर्षाच्या धोनीने घेतला अप्रतीम झेल ,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

टायगर अभी जिंदा है! 42 वर्षाच्या धोनीने घेतला अप्रतीम झेल ,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 च्या सातव्या सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने असा कारनामा केला आहे की, तो पाहून सर्वच क्रिकेट प्रेमी दंग झाले आहेत. गुजरात टायटन्सचा खेळाडू विजय शंकर याचा झेल 0.60 सेकंदामध्ये डाईव्ह मारून पकडला. 42 वर्षाच्या महेंद्रसिंग धोनीने हवेत सूर मारून झेल पकडल्याने सारेच चकित झाले आहेत. झेल घेतानाचा हा व्हिडिओ प्रचंड वायरल होतोय. हा अप्रतिम झेल पाहून प्रत्येक जण त्याचे कौतुक करत आहेत.

गुजरात टायटन्सची धावसंख्या 34 धावांवर दोन बाद अशी होती. त्यावेळी साई सुदर्शन आणि विजय शंकर हे खेळपट्टीवर टिकून होते. या दोन्ही तमिळनाडूच्या खेळाडूचे चेपॉकचे मैदान होम ग्राउंड होते. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड याने गोलंदाजी मध्ये बदल करत डेरेल मिचेल याच्याकडे चेंडू सोपवला. विजय शंकर थर्डमॅनच्या दिशेने फटका मारण्याच्या नादात बाद झाला. धोनीने त्याच्या उजव्या बाजूला हवेत सूर मारून तो झेल पकडला.

या दरम्यान धोनी त्याच्या शरीरापासून 2.3 मीटर लांब हवेत सूर मारून झेल पकडला होता. हवेत सूर मारताना धोनीचे दोन्ही पाय पण हवेत होते. त्याचा हा अप्रतिम झेल पाहून त्याचा सहकारी मित्र सुरेश रैना याचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला. सुरेश रेनाने धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे इंस्टाग्राम पोस्टवर त्याने लिहिले की, “ही गोष्ट जरा ध्यानात ठेवा सर. माही भाई नेहमीच सुदृढ राहतो आणि सगळ्यांना प्रेरित करतो. टायगर अभी जिंदा है”!

टायगर अभी जिंदा है! 42 वर्षाच्या धोनीने घेतला अप्रतीम झेल ,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

धोनीचा हा झेल त्याच्यासाठी खास आहे. कारण मागील वर्षी आयपीएल 2023 नंतर त्याने त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच धोनी आयपीएल मध्ये खेळतोय. दुखापतीची परवा न करता धोनीने हवेत सूर मारून पकडलेला हा झेल खरोखरच कौतुकास्पद होता. या झेलमुळे त्याने अनेकांचे हृदय जिंकले. याच सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे यांनी डेविड मिलरचा डाईव्ह मारून अप्रतिम झेल घेतला. त्याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होतोय.

सामन्याविषय बोलायचे झाले तर, चेन्नई सुपर किंग्सने 2024च्या सातव्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. प्रतिउत्तरात गुजरात टायटनच्या खेळाडूंनी आठ बाद 143 धावाही करू शकल्या. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतला हा चेन्नईचा दुसरा विजय ठरला. बंगळूर संघाचा त्यांनी पराभव केला होता. चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना 31 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत विशाखापट्टणम येथे होणार आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *