महेंद्रसिंग धोनीच्या नावावर नोंदवलेले असेच काही खास विक्रम, जे इतर कोणी मोडू शकले नाहीत, कदाचित तोडू शकणार नाहीत.
महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच एक अनुभवी आणि आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. महेंद्रसिंह धोनी ने आपले पुरते आयुष्य भारतीय क्रिकेट संघासाठी घालवले.

महेंद्रसिंह धोनी ने क्रिकेट इतिहासात असे काही रेकॉर्ड बनवले आहेत जे आजपर्यंत कोणीच तोडू शकत नाही. महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू होता.
धोनी ने बनवलेले क्रिकेट इतिहासातील रेकॉर्ड:-
धोनी ने एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. 31 ऑक्टोबर 2005 रोजी जयपूर येथे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या.
धोनीने कर्णधार म्हणून ICC T20 विश्वचषक, ICC एकदिवसीय विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याच्याशिवाय जगातील अन्य कोणत्याही कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही.
एकही अर्धशतक न झळकावता धोनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. धोनीने 75 टी-20 सामन्यात 1153 धावा केल्या आहेत. मात्र यादरम्यान त्याने एकही शतक झळकावले नाही. त्याच्या बॅटने पहिली टी-२० 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 66 डावांनंतर शतक ठोकले होते.
धोनी उत्कृष्ट फलंदाज असल्यामुळे धोनी फार कमी वेळा गोलंदाजी करत. त्याने एकूण 9 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आणि यष्टिरक्षक म्हणून असे करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.
धोनीने कर्णधार म्हणून 332 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि या बाबतीत त्याला कोणीही मागे सोडू शकणार नाही. तसेच अनेक विजय भारतीय संघाला मिळवून दिले आहेत.