वडिलांनी कारगिल च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारली तर मुलगा आयपीएल मध्ये पाडतोय धावांचा पाऊस, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू.
आयपीएल २०२३ च्या ८ व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल चा ५ धावांनी किंग्ज पंजाब ने पराभव केला. टॉस झाल्यानंतर पंजाबने प्रथमतः बॅटिंग केली आणि राजस्थान रॉयल या संघापुढे १९७ धावा चे टार्गेट ठेवले.


जे की राजस्थान रॉयल ला हे टार्गेट पूर्ण करता आले नाही. राजस्थान ने १९२ धावा पुर्ण केल्या आणि ५ धावांनी त्यांचा पराभूत झाला. या सामन्यात राजस्थान पराभव झाला असला तरी राजस्थान ने मॅच जिंकली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात राजस्थान ला एक नवा खेळाडू भेटला आहे त्याचे नाव म्हणजे ध्रुव जुरेल. ध्रुव ने आपल्या बॅटिंग च्या जोरावर राजस्थान ला मॅच जिकवत आणली होती.
राजस्थान च्या ध्रुव जुरेल ने पंजाब किंग्ज च्या विरुद्ध १५ बॉल्स मध्ये ३२ धावा केल्या. जे की ७ व्या विकेट्ससाठी ध्रुव ने हेटमायर सोबत २६ बॉल्स मध्ये ६१ धावा केल्या होत्या. ध्रुव जुरेल ने आपल्या या खेळामध्ये जवळपास राजस्थान रॉयल ला जिंकवण्याचा प्रयत्न केला होता मात्र ही जित काही शक्य झाली नाही. जरी ध्रुव जुरेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला असेल तरी त्याने आपले संघर्ष आणि खेल दाखवून सर्वांची मने जिंकली आहेत.
ध्रुव जुरेल हा फक्त २२ वर्षीय वय असलेला खेळाडू आहे. उत्तर प्रदेश मधील हा प्रथम श्रेणीचा क्रिकेटपटू आहे. २०२२ साली ध्रुव जुरेल या २२ वर्षीय खेळाडू ला राजस्थान रॉयल या संघाने अगदी २० लाख रुपये ला विकत घेतले होते. जे की २०२३ साठी या संघाने त्याला ठेवले. २०१९ मध्ये झालेल्या अंडर 19 आशिया चषक साठी ध्रुव जुरेल ने भारत संघाचे नेतृत्व केले आणि भारताने हे आशिया चषक जिंकले.
ध्रुव जुरेल चे वडील हे आर्मी रिटायर आहेत. १९९९ मध्ये ध्रुव च्या वडिलांनी कारगिल चे युद्ध लढले होते. या कारगिल च्या युद्धात पाकिस्तान चा पराभव केला होता. ज्यावेळी ध्रुव च्या वडिलांनी या युद्धात भाग घेतला होता तेव्हा ध्रुव चा जन्म देखील झाला न्हवता.
ध्रुव च्या वडिलांना ध्रुव ला सैनिक बनवयचे होते मात्र ध्रुव ला लहानपणापासूनच क्रिकेट ची आव होती. जे की आज ध्रुव पहिली त्याच्या स्वतःच्या कमाईचा पायरी चढत आहे. ध्रुव जुरेल ने आपला आयपीएल मध्ये आपला खेळ चांगला दाखवला तर तो पुढे भारत संघासाठी सुद्धा खेळू शकतो.