विराट कोहलीला फॉलो करणाऱ्या ‘ध्रुव जुरेल’चा फिटनेस तुम्ही पाहिला आहे का? इंस्टाग्राम वर आहे फेमस!

0

 IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेदरम्यान भारताला ध्रुव जुरेलच्या रूपाने एक नवा उभारता स्टार खेळाडू मिळाला आहे. 23 वर्षीय या यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या खेळणी सर्वांनाच प्रभावित केले आहे. पहिल्या दोन कसोटी मध्ये यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हा फलंदाजी छाप सोडण्यात अपयशी ठरल्याने राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत ध्रुवला संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे दोन्ही हाताने सोने करत त्याने 46 धावांची छोटेखानी लक्षवेधी खेळी केली.

फिटनेसच्या बाबतीत विराट कोहली एवढाच  शार्प आहे ध्रुव जुरेल..!

रांची येथे झालेल्या चौथ्या आणि महत्त्वाच्या कसोटी मध्ये त्याने पहिल्या डावात 90 धावांची तर दुसऱ्या डावात नाबाद 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने गिल सोबत पाचव्या विकेटसाठी 72 धावांची नाबाद भागीदारी करून भारताच्या विजयाची गुढी उभारली. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आक्रमक स्टाईलने फलंदाजी करणाऱ्या 23 वर्षीय ध्रुवने यष्टिरक्षणात देखील धोनीसारखी चपळाईता दाखवून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by J U R E L (@dhruvjurel)

ध्रुव उत्तर प्रदेश मधील आग्रा जिल्ह्याचा रहिवासी आहे. 7 फूट 8 इंच उंची लाभलेल्या ध्रुवचा फिटनेस हा विराट कोहली सारखा वाटतो. व्यायाम करतानाचे त्याने अनेक फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तो नियमितपणे शेअर करतो. वेट मेंटेन करण्यासाठी तो डायटला प्रॉपर फॉलो करतो. हेवी वेट लिफ्टिंग आणि कार्डिओवर त्याचा जास्त भर असतो. त्याची काटक शरीरयष्टी पाहून प्रत्येकाला विराट कोहलीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. फिटनेसच्या बाबतीत जुरेल विराट कोहलीचा चाहता आहे. इंस्टाग्रामवर त्याला 255k इतके फॉलोवर्स देखील आहेत.

विराट कोहलीला फॉलो करणाऱ्या 'ध्रुव जुरेल'चा फिटनेस तुम्ही पाहिला आहे का? इंस्टाग्राम वर आहे फेमस!

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये त्याच्या वडिलांनी सेवा बजावली आहे. ध्रुवने देखील सैन्यांमध्ये प्रवेश करून देशाची सेवा करावी अशा तशी त्यांच्या वडिलांची मनोमन इच्छा होती. मात्र ध्रुवला एक चांगला क्रिकेटपटू बनायचे होते. म्हणून त्याने बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर क्रिकेटवर सारे लक्ष फोकस केले. 2020 मध्ये त्याला 19 वर्षाखालील संघाचा उपकर्णधार पदाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देण्यात आली. 19 वर्षाखालील आशिया चषक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by J U R E L (@dhruvjurel)

ध्रुवचे टॅलेंट पाहून त्याला लगेच आयपीएल मध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली. 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 20 लाख रुपयांच्या किमतीत घेतले. मात्र त्यावर्षी त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. 2023 मध्ये त्याला पुन्हा रिटेन करण्यात आले. पहिल्या सामन्यात त्याने पंजाब विरुद्ध खेळताना 15 चेंडू तीन चौकार आणि दोन षट्काराच्या सहाय्याने तडाखेबाज 32 धावांची खेळी करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. 2023 मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतील 13 सामन्यात 172.73 च्या सरासरीने 152 धावा केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by J U R E L (@dhruvjurel)

भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी देखील ध्रुवचे टॅलेंट पाहून त्याची तुलना धोनीशी केली आहे. धोनीप्रमाणे त्यालाही भारतीय संघाचे नेतृत्व करायचे आहे. संयमाने आणि हुशारीने विकेटच्या मागे विरोधी फलंदाजांना यष्टीचीत करण्यात त्याच्याकडे नैपुण्य आहे. तसेच तो एबी डिव्हिलियर्सला फलंदाजीत आपला आदर्श मानतो. रोहित आणि विराट सारख्या दिग्गज फलंदाजांकडून 23 वर्षीय ध्रुवला खूप काही शिकण्यास मिळेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!

 एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी

Leave A Reply

Your email address will not be published.